मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 14:57 IST2022-12-03T14:57:04+5:302022-12-03T14:57:17+5:30
मानवत तालुक्यातील रामेटाकळी शिवारातील घटना

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
मानवत ( परभणी ) : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यापाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे 5:30 वाजता तालुक्यातील रामेटाकळी शिवारात घडली.शांतीलिंग नरहरीअप्पा व्यवहारे असे मृताचे नाव आहे.
तालुक्यातील रामेटाकाळी येथील व्यपारी शांतीलिंग नरहरीअप्पा व्यवहारे हे नेहमी प्रमाणे शनिवारी पहाटे मॉर्निग वॉकसाठी गेले होते. हमदापूरफाट्याकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर फिरत असताना पोखरणी कडून पाथरीकडे जाणाऱ्या अद्यात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यावेळी सोबत फिरायला आलेल्या ग्रामस्थानी घटनेची माहिती व्यवहारे यांच्या कुटूंबातील सदस्यांना दिली. त्यानंतर त्यांना तातडीने परभणी येथील खाजगी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, याठिकाणी त्यांना मृत घोषीत करण्यात आले. माहिती मिळताच सपोनि आनंद बनसोडे, भारत जाधव यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली असल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.