७६ हजार नागरिक कोरोना लसीपासून दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:22 IST2021-08-24T04:22:51+5:302021-08-24T04:22:51+5:30

कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने युद्धपातळीवर कोरोना लसीकरण सुरू ...

76,000 citizens away from corona vaccine | ७६ हजार नागरिक कोरोना लसीपासून दूरच

७६ हजार नागरिक कोरोना लसीपासून दूरच

कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने युद्धपातळीवर कोरोना लसीकरण सुरू आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करून घेण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाहीत. तालुक्यातील १४३ गावांतील ९५ हजार नागरिकांपैकी केवळ ३९ हजार ५८५ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर ११ हजार २३७ जणांनी लसीचा दुसरा डोस पूर्ण केलाय आहे. यामध्ये धारासूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४ गावे असून या गावातील केवळ ७ हजार २ जणांनी लसीचा पहिला तर २ हजार ९९ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच कोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २९ गावांचा समावेश आहे. या गावातील १० हजार ३६५ जणांनी पहिला तर २ हजार ६९१ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. महादपुरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २० गावांचा समावेश समावेश असून ६ हजार ७४१ जणांनी पहिला तर १ हजार ९०२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. मर्डसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १० हजार ७७६ जणांनी पहिला तर ५४७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ३१ गावांचा समावेश आहे. या गावांतील ७ हजार ८४७ जणांनी पाहिला तर २ हजार २४४ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४९ गावांचा समावेश आहे. या गावातील ५ हजार ९५७ जणांनी पाहिला तर १ हजार ७५४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.

शहरात केवळ १४ हजार ५३ नागरिकांचे लसीकरण

गंगाखेड शहरातील ३५ हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. मात्र शहरातील उपजिल्हा रुग्णालयात केवळ १४ हजार ५३ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्येही ६ हजार ६०५ एवढ्याच नागरिकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण केले. त्यामुळे ग्रामीण भागापाठोपाठ शहरी भागातील नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने लसीकरणाबाबत जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: 76,000 citizens away from corona vaccine