शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

एनएमएमएस परीक्षेत ३९३ विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:18 IST

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात ...

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जिल्ह्यातील जि. प. शाळेतील ३९३ विद्यार्थ्यांनी यश मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

राज्य शासनाच्या ''शाळा बंद शिक्षण सुरु'' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील अध्यापन व अध्ययन प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली. वर्षभरापासून सुरू केलेल्या अभ्यास गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी ग्रामीण भागात प्रभावीपणे शिक्षण प्रक्रिया राबवली. या शाळांमध्ये असणाऱ्या सर्वसामान्य व कष्टकरी मुलांमध्ये शैक्षणिक जाणीवा निर्माण करण्याबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रमही प्रभावीपणे राबविण्यात आले. याच शैक्षणिक उपक्रमांचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन स्तरावर विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेशित करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला होता.

मंगळवारी एनएमएमएस परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ३९३ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. परभणी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली असून, तालुक्‍यातील १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्याप्रमाणे मानवत तालुक्यातील १११, पाथरी ८६, सेलू २६, पूर्णा ११, गंगाखेड व पालम प्रत्येकी ८ आणि जिंतूर तालुक्यातील ७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मलाताई विटेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, शिक्षण सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांनी शिक्षण विभागाचे आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरही जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांनी अभ्यास गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे अध्ययन कार्य केले. त्याला विद्यार्थी व पालकांनी केलेल्या सहकार्यामुळेच सर्वांच्या कष्टाचे चीज झाले. या निकालाने जि. प. शाळामधील शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

सुचिता पाटेकर, शिक्षण अधिकारी (प्रा)