परभणीतील रोशनखान भागात १८ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 15:13 IST2019-06-28T15:12:19+5:302019-06-28T15:13:08+5:30
पाच तासांच्या या कारवाईनंतर पोलिसांनी १८ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला

परभणीतील रोशनखान भागात १८ लाखांचा गुटखा पकडला
परभणी- शहरातील रोशनखान मोहल्ला भागात स्थानिक गुन्हा शाखा आणि अन्न औषध प्रशासनाने केलेल्या संयुक्त कारवाईत १८ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील रोशनखान मोहल्ला भागात एका गोदामात गुटख्याचा साठा करुन ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे २७ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यानंतर नानलपेठ पोलीस ठाण्याच्या पथकही या ठिकाणी दाखल झाले. पाच तासांच्या या कारवाईनंतर पोलिसांनी १८ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी तिघांना अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात परभणीत गुटख्याचा साठा जप्त केल्याने गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.