शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या प्रेमाला नकार देणारे तुम्ही कोण?

By admin | Updated: February 5, 2015 19:19 IST

प्रेम करण्याचा अधिकार मागत पुण्यात तरुण मुला-मुलींनी काढलेल्या रॅलीचा थेट सवाल. वेळ सकाळी अकरा वाजताची.

कलिम अजीम -
प्रेम करण्याचा अधिकार मागत पुण्यात तरुण मुला-मुलींनी काढलेल्या रॅलीचा थेट सवाल.
वेळ सकाळी अकरा वाजताची.
पुण्यातील गुडलक चौकात दोन तरु ण गुलाबी रंगाचा ‘‘राइट टू लव्ह’’ नावाच्या मजकूराचा बॅनर घेऊन उभे आहेत. प्रत्येक बाइकस्वार जरासा पॉज घेऊन या तरुणांना न्याहाळत मजकूरावर नजर फिरवतोय, काहीजण स्मार्ट म्हणवणार्‍या फोनमधून फोटो टिपताहेत, तर काही ‘‘हं’’ म्हणून निघून जाताहेत. सुमारे दहा मिनिटं हिच फ्रे म,अकराव्या मिनिटाला एकजण ‘शेम..’ लिहिलेला ब्लॅक बलून्स घेऊन त्या दोघांजवळ येऊन थांबतो, बघ्याच्या नजरा आता जरा जास्तच खिळत आहेत. पुढच्या काही मिनिटात कॉलेज यंगस्टर्सचे जथ्थे चौकाच्या दिशेने येत चालू लागतात. काहींच्या हातात स्लोगनच्या पाट्या तर काहींच्या हाती गुलाबी-लाल रंगाचे लव्ह मॅसेजेस लिहिलेले मोठ्ठाले फुगे. बघता-बघता जाम गर्दी जमलीय. पंधराव्या मिनिटाला चौक घोषणांनी दुमदुमलाय, जोरदार घोषणांनी चौकात चलबिचल सुरू झालीय,‘आम्हाला हवाय राइट टू लव्ह.’
‘प्रेम आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं..’, ‘आम्ही चालत आहोत, जगत आहोत, मरत आहोत फक्त प्रेमासाठी..’, ‘माझा देह., माझा अधिकार’ 
घोषणा सुरूच. दीडदोनशे तरुण मुलं-मुली. दोनदोनची जोडी करून एका रांगेत उभे. ‘सपोर्ट टू लव्ह, राइट टू लव्ह.’, ‘वुई वॉण्ट राइट टू लव्ह.’, ‘त्यानं प्रेम केलं, तिनं प्रेम केलं, तुमच्या बापाचं काय गेलं.’अशा आशयाचे बॅनर्स घेऊन तरु णींचा एक जथ्था चौकातल्या गर्दीत तेवढय़ात सामील होतो. सुमारे पंधरा मिनिटांत चौकातला ट्रॅफीकचा आवाज नाहीसा करण्यात ही तरुणाई यशस्वी ठरली. घणघणाती घोषणा देत जथ्थ्याचे ‘‘राइट टू लव्ह’’ रॅलीत रूपांतर झाले,आता ही रॅली फग्यरुसन कॉलेजच्या दिशेनं चालू लागली.  
-हे सारं काय होतं? 
 प्रेमात पडलेल्या एका तरु णीला संस्कृती रक्षणाच्या नावानं बेदम मारहाण केल्याचं वृत्त १५ जानेवारीला राज्यातील प्रत्येक न्यूज चॅनलवर दाखवलं गेलं.  त्याचकाळात अनेकांच्या व्हॉट्स अँपवर त्या मुलीला मारहाण होत असल्याचे व्हीडीओ शेअर होत होते. आपापल्या घरात/कट्टय़ांवर अनेक तरुण मुला-मुलींनी ते व्हीडीओ पाहिले चहा-बिस्कीटासोबत निषेधही नोंदवला. लातूर जिल्ह्यातील अकोली गावात दीड महिन्यापूर्वी घडलेली ही घटना. त्यानंतर तो व्हीडीओ व्हायरल झाला. (किंवा करण्यात आला.) त्यावर हळहळ झाली. काही चर्चा झाल्या; पण काही तरुण मुलं मात्र हादरलेही आणि संतापलेही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणार्‍या काही तरुणांनी एकत्र येऊन प्रतिकात्मक निषेध नोंदवायचं ठरवलं, आणि तो निषेध म्हणजे ही राइट टू लव्ह रॅली. लातूरच्या घटनेच्या निमित्तानं समाजात प्रेमाच्या अधिकाराची जाणीव व जनजागृती व्हावी, असं या रॅली काढणार्‍यांना अपेक्षित होतं. पण, पुण्यातल्या तरुण मुलांनी प्रचंड संवेदनशीलतेनं या विषयात सहभाग घेतला असं काही झालं नाही. पेशावर हल्ला, चार्ली एब्दो प्रकरणात ‘स्वातंत्र्य’ आणि ‘लोकशाही’ विषयी सोशल नेटवर्किंगवर पोटतिडकीनं बोलणार्‍या तरुण जगाला या आपल्या ‘देशी’ वास्तवाबद्दल काही बोलावं असं वाटलं नाही. 
हे कसले नियम?
गाव-खेड्यात कशाला अनेक शहरातही अनेक प्रेमी युगुलांना उघडपणे भेटता येत नाही, बोलता येत, एखाद्या बागेत, निसर्गरम्य ठिकाणी तरुणांना मारहाण होते, गुंडांचा त्रास होतो, त्याच्या बातम्याही प्रसिद्ध होतात. पण, यासार्‍या संदर्भात तरुण मुलं कधीकाही बोलत नाही. (मुली तर बोलूही शकत नाहीत.)
पुढच्याच येणार्‍या व्हॅलेण्टाइन डे लाही आपल्याकडे एकेकाळी विरोध झालाच होता; पण त्यामागची बाजारपेठीय ताकद वाढली तसा तो विरोध निवळला. शहरात हे असे बदल घडत असताना ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र आजही कुणी कुणाच्या प्रेमात पडणं, भेटणं ही आकाशा-पाताळ एक करणारी घटना ठरते. 
 तरुण झालेली दोन माणसं आपल्या मर्जीनं जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही, हे कसले नियम? आपला जोडीदार कसा असावा, तो आपण निवडावा हे मूलभूत स्वातंत्र्य आहे हेदेखील आपल्या समाजाला आजही मान्य नाही हाच या सार्‍याचा अर्थ नव्हे काय? आणि एवढं करूनही कुणी पडलंच प्रेमात तर प्रेमाला घरचे स्वीकारत नाहीत आणि समाज मान्यता देत नाही. एकीकडे पालक आणि दुसरीकडे समाजाच्या वाईट नजरा, कोणा-कोणास स्पष्टीकरण देत फिरायचे?
 जातीव्यवस्थेची दरी कमी करण्यासाठी आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्न व्हावीत यासाठी शासनाकडून पुरस्कार आणि विविध योजना राबविल्या जातात. मात्र, जातीपातीचे दबाव ग्रामीण भागात आजही इतके जास्त आहे की, परजातीतच कशाला स्वजातीतल्या मुलाच्या प्रेमात पडण्याइतपत स्वातंत्र्य अजूनही ग्रामीण भागातल्या मुला-मुलींना नाही.
आणि म्हणूनच या रॅलीत सहभागी झालेल्या अनेकांचा एकच सवाल होता की, आमच्या प्रेमाला नकार देणारे तुम्ही कोण? प्रेमात पडणार्‍यांना धडा शिकवणारे तुम्ही कोण?’ 
अर्थात असं एका रॅलीनं इतक्या अवघड प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, मिळणारही नाहीत. पण, निदान तरुण मुलांना आपला जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य हवं, हा प्रश्न तरी यानिमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आला इतकंच!