what kind of challenges young lawyers are facing today? | नव्या तरुण वकिलांसमोर आज कोणती आव्हानं आहेत?
नव्या तरुण वकिलांसमोर आज कोणती आव्हानं आहेत?

ठळक मुद्देशहाण्यांनी कोर्टाची पायरी चढावी, यासाठी तरुण वकिलांपुढचे पर्याय

अ‍ॅड. दीपक चटप (निर्माण 7) , अ‍ॅड. स्नेहल जाधव (निर्माण 9), अ‍ॅड. बोधी रामटेके (निर्माण 9)

अलीकडेच भास्कर मधुरम आणि लेनिन कुमार यांच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश जे.एन. किरु बाकरन यांनी अत्यंत दुर्‍खद मत व्यक्त केलं. ते म्हणतात,  The noble profession of advocates has reached the most worst condition and nowadays the only aim of the lawyers is to fill their pockets.  वकिली या पेशाची वाटचाल या दिशेने होत असेल तर नक्कीच हे चिंताजनक आहे.
कित्येक लोकांना वकिलांची फी देण्यासाठी दागिने, जमीन, मौल्यवान वस्तू इत्यादी गोष्टी विकाव्या लागतात. प्रत्येक तारखेला गेल्यावर वकीलसाहेबांचा एकच प्रश्न असतो की, ‘आज किती आणलेत.?’
..आणि कोर्टातून घरी जाताना एकच वाक्य असतं की, ‘पुढच्या तारखेला हे काम करायचं आहे आणि त्यासाठी एवढे-एवढे पैसे घेऊन या.. तुम्ही एकदम दिली ती माझी फी होती. हे पैसे तर कोर्टाच्या कामकाजासाठी लागणार आहेत. काम करून घेण्यासाठी कोर्टाच्या क्लार्कला पैसे द्यावे लागतात. मी तुम्हाला न्याय मिळवून देईनच त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त पैसे द्या.. आपण वर्पयत मॅनेज करू !’ 
.. हे सारं असं सुरू राहतं आणि अनेकदा आपल्याला न्याय मिळेल या माफक अपेक्षेने लोकांची हयात कोर्टात  जाताना दिसते.
हे असं का होतंय याचा विचार आता यापुढच्या काळात कायद्याचं शिक्षण घेणार्‍यांनी तरी करायला हवा. हा पेशा हे आपल्या आयुष्यातील एक मोठं आव्हान असून, ते आव्हान पेलण्याची ताकद नव्यानं विधिक्षेत्नात येणार्‍या वकिलांनी निर्माण करायला हवी. कायद्याचे शिक्षण घेत असताना प्रत्येकाने सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवला तर शिक्षण झाल्यावर स्वतर्‍ला नेमकं काय करायचं आहे याचं उत्तर स्पष्ट होत जातं.
आज समाजात वकिलांबद्दल तयार झालेली धारणा म्हणजे वकिली हे खोटं बोलणार्‍यांचे क्षेत्न आहे, तर आता प्रत्येक वकिलाची ही जबाबदारी आहे की आपल्या कार्यातून या क्षेत्नाबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल असलेली चुकीची धारणा दूर करायला हवी. न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून वकील हा सत्य बोलणारा आणि  पारदर्शकसुद्धा असू शकतो हेसुद्धा सिद्ध करून दाखवावं लागेल. यात नक्कीच अपवाद आहेतच; पण जे समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात आणि शोषित घटकांना न्याय मिळवून देणं हा ज्यांचा ध्यास असतो ते वकील नक्कीच पारदर्शी आणि सत्य बोलणारे असतात.
पैसे घेऊन खोटी बाजू लढावी का? हा मोठा प्रश्न तरुण वकिलांसमोर उभा राहू शकतो. तेव्हा याचे उत्तर वकिलांच्या विचार करण्यावर अवलंबून असते. अशा वेळेस वकिलांनी आपल्या विवेकबुद्धीने विचार करावा की, आपण करत असलेलं कार्य हे कुणाला न्यायापासून वंचित तर करत नाहीत ना..?. पैशासाठी जर कुणाचे हक्क, न्याय हिरावले जात असतील, तर तो त्या न्यायाच्या मूल्यांचा पराभव आहे. जर वकीलच न्यायाचं मूल्य पराभूत करत असेल तर हा तिसरा स्तंभ सक्षम कसा होईल.? याचं चिंतन प्रत्येक नवीन तरुण वकिलानं करायला हवं.
चार भिंतीच्या ऑफिसमध्ये बसून ड्राफ्टिंग करणं आणि केवळ आलेल्या केसेस कोर्टात जाऊन भांडणं इतका मर्यादित हेतूू वकिलीचा नसावा. सर्वच कायदेशीर प्रश्न न्यायालयाच्या माध्यमातून सोडवायचे असा आग्रह वकिलाने धरणंदेखील हिताचं नाही. न्यायालयात लागणारा वेळ, अधिकचा पैसा ही सर्व न्याय मिळवण्याची प्रक्रि या हीच एक शिक्षा वाटू लागते. वकिलांचा एक गोड गैरसमज असतो की, मी सर्वात शहाणा आहे. माझ्यापेक्षा चांगलं इतरांना कळत नाही. हे खूळ डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. न्याय आणि  निवाडा (फैसला) या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. ऑफिसमधील चार भिंतीच्या बाहेर असलेल्या जगाशी दोन हात करण्याची धमक उराशी बाळगायला हवी. वेळप्रसंगी फिल्ड व्हिजिट, शक्य असेल तिथे पक्षकाराला कोर्टाची पायरी चढायला न लावता सल्लामसल्लत करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा.
संविधानाच्या प्रास्ताविकतेत आलेली स्वातंत्र्य समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीच्या प्रतिष्ठा इत्यादी मूल्यांना पूरक अशा भूमिका तरुण वकिलांनी घ्यायला हव्यात. महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारखे अनेक महान स्वातंत्र्यसेनानी  वकील  होते. आजदेखील देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्नात वकील अग्रेसर आहेत. ज्या वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ न्यायालयापुरता न ठेवता सर्वसामान्यांचे प्रश्न व नैतिक मूल्य रुजविण्यासाठी केला तेच समाजासाठी आदर्श ठरले. हे नव्याने वकिली पेशात येणार्‍या मित्रांनी लक्षात घ्यावं.
आदिवासी, भटके, दलित, स्री व इतर घटकांचे अनेक प्रश्न आज अस्तित्वात आहेत. पण अनेक कारणांमुळे त्यांना न्याय मिळविण्यात अडचणी येतात. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे न्याय मिळवणं महागडं झालं आहे. तेव्हा ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की, वकील आकारत असलेले पैसे हे दुर्बलांना अधिक दुर्बल तर करीत नाही ना.?
शहाण्यानी कोर्टाची पायरी चढावी आणि त्यातून न्यायाचं मूल्य अधिक बळकट व्हावं, असं वाटत असेल तर समाजाभिमुख वकिलीचा पायंडा नव-तरुण वकिलांनी  निर्माण  करावा. सरतेशेवटी, वकील हादेखील एक माणूस आहे आणि न्यायाच्या मार्गाने चालायचं ठरवल्यानंतर येणार्‍या खाचखळग्यांना प्रामाणिकपणे पार करीत त्याच्यातलं माणूसपण जिवंत ठेवलं पाहिजे. तरच लोकशाहीतील हा तिसरा स्तंभ सर्वसामान्यांना आपलासा वाटेल. समाजाची, समाजस्वास्थ्याची  अत्यंत महत्त्वाची धुरा आता नव्या तरुण वकिलांवर आहे हे निश्चित !

*********************

तरुण वकिलांना करता येतील अशा काही गोष्टी

अलौकिक बुद्धीने दोन्ही पक्षांचा मिलाफ घडवून आणणं हे वकिलांचं मुख्य कर्तव्य आहे, असे गांधीजी म्हणायचे.
त्या वाटेवर चालायचं तर नव्यानं वकिली क्षेत्नात येणार्‍या  मित्न-मैत्रिणींना करता येतील, अशा या काही गोष्टी र्‍
* आदिवासी व गैरआदिवासी समूहांना/व्यक्तींना सामूहिक अथवा वैयक्तिक वनहक्क मिळवताना मोठय़ा अडचणी येत आहेत. वनहक्क कायदा 2006च्या मदतीने ‘वनहक्क’ मिळवून देण्यासाठी काम करणं.
* तुरुंगातील कैदी ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे; पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना वकील मिळत नाही. तेव्हा, अशा कैद्यांच्या ‘प्रो-बोनो’ केसेस चालवणं.
* समूहावर विपरीत परिणाम करणार्‍या सामाजिक प्रश्नांना जनहीत याचिकेतून वाचा फोडणं.
* आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी संबंधित समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात केसेस चालवणं.
* कामगारांना योग्य ते वेतन व मोबदला मिळावा, वेठबिगारीचे प्रश्न सुटावे यासाठी काम करणं.
* शेतकरी, महिला, बालक, अंध, अपंग, भिकारी इत्यादींचे प्रश्न जनहीत याचिकांतून मांडणं.
* सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा सोप्या भाषेत कायद्याची माहिती देणारी पुस्तिका काढणं.

**********************

‘तुम्ही’ काय अनुभवता/सोसता आहात?

तरुण वकिलांना चर्चेसाठी ‘ऑक्सिजन’चं खास आमंत्रण
तरुणांच्या  ‘निर्माण’ या आंदोलनाशी आपण परिचित आहोतच.  ‘निर्माण’च्या सातव्या आणि नवव्या सत्रात सहभागी झालेल्या तरुण वकील मित्रांनी लिहिलेला हा लेख वाचलात?
काय वाटलं?
नुकताच म्हणजे 3 डिसेंबरला अ‍ॅडव्हेकेट्स डे साजरा झाला. त्यानिमित्तानं अनेक कार्यक्रम झाले. मात्र तरुण, नव्या वकील मित्रांचं जगणं कसं आहे? त्यांच्या करिअरचा संघर्ष कसा आहे?
मी ‘लॉ’ करतोय, एलएलएम करतोय असं अभिमानानं सांगून ते जेव्हा प्रत्यक्ष ‘प्रॅक्टिस’ सुरू करतात तेव्हा त्यांच्या वाटय़ाला काय झगडा येतो?
आर्थिक विवंचना ते कामासाठी कराव्या लागणार्‍या अनेक तडजोडी यासार्‍यात ते कसे जगतात?
या प्रश्नांविषयीही बोलायला हवं?
- पण कोण बोलणार?
तुम्हीच बोला, म्हणून ही एक खास विनंती !
नव्या दमाच्या तरुण वकील मित्रमैत्रिणींनीच त्यांचे प्रश्न आणि वकील म्हणून काम करताना येणार्‍या अडचणी सांगाव्यात, म्हणून ‘ऑक्सिजन’ खास जागा उपलब्ध करून देत आहे.
कोर्टाच्या आवारात घोळक्याने उभ्या असलेल्या तरुण वकिलांच्या जे मनात येतं, अनुभवाला येतं, डाचतं, डोक्यात साचत राहातं; ते काय आहे?
लगA जमवण्यापासून ते उत्तम प्रॅक्टिस सेट होण्यार्पयत, ज्युनिअर म्हणून काम करताना कराव्या लागणार्‍या धावपळीपासून कायद्याच्या जगातले डावपेच शिकण्यार्पयत !!!
- मोकळेपणाने लिहा. या प्रश्नांतून तुम्ही वाट काढत यशस्वी ठरला असाल तर त्यासाठी काय केलं ते सांगणारा प्रवासही जरूर लिहा.
निवडक प्रतिक्रियांना ‘ऑक्सिजन’मध्ये प्रसिद्धी देण्यात येईल.
नावासह लिहा, नाव प्रसिद्ध होऊ नये अशी इच्छा/गरज असेल, तर नावाविना लिहा.. पण तरुण वकिलांच्या जगाचं वास्तव- चित्र मांडायला आम्हाला मदत करा!

इमेल करणार असाल, तर -oxygen@gmail.com
अंतिम मुदत - 12 डिसेंबर 2019

 

Web Title: what kind of challenges young lawyers are facing today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.