what happens when young rural boy falls in love? | पोरं प्रेमात पडतात, तेव्हा काय मॅटर होतं?
पोरं प्रेमात पडतात, तेव्हा काय मॅटर होतं?

ठळक मुद्दे सुंदर मुलीसाठी पोरं पार वेडे होतात़ तिला जसं आवडेल तसंच राहातात़

- साहेबराव नरसाळे

अहमदनगर शहरातील तारकपूर बस स्टॅण्ड़ पोरांचा एक जथा वांबोरी बसभोवती पिंगा घालतो़  या खिडकीतून डोकाव, त्या खिडकीतून पहाय़़  असं त्यांचं चाललेलं़; पण ‘ती’ काही सापडत नाही़  शेवटी निराश होऊन सर्वजण बस स्टॅण्डच्या बाकडय़ांवर पाय दुमडून बसतात़ मित्राला चिडवायला लागतात़ 
‘तुला गुंगारा देऊन ती उडाली भुर्ऱ  तू बस इथंच घिरटय़ा घालत़़  किती दिवस असं शेळपाटासारखं वागणाऱ’
तो पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणारा़  आई-बाप दोघेही नोकरदाऱ शिडशिडीत देहयष्टीचा़ दिसायलाही काळासावळा़  तो शहरी अन् ती खेडूत़; पण दिसायला सुंदर,़  शहराला रुळलेली़  शिक्षणासाठी ती रोज बसने येत होती़  कॉलेज सुटल्यावर हा तिचा पाठलाग करीत थेट तिच्या गावार्पयत जायचा़  बसमध्ये त्यांचं गॉटमॅट जुळलं़  बर्‍याच दिवस टिकलंही़  रोज दोघे कॉलेज सुटल्यावर हॉटेलमध्ये जेवायच़े  रोज नवी चव तिच्या जिभेवर रेंगाळायची़  त्याच्या पैशावर ती वाटेल ती हौस पूर्ण करायची़  त्याच्या महागडय़ा गाडीवरचा वेगाचा थरार तिला हवाहवासा वाटायचा़  तिचा रोजचा खर्च वाढतच चाललेला़  आई-बाप पैसे द्यायला कानकूस करू लागल़े  मित्रांची उधारीही डोईजड झाली़  शेवटी तो किटूकमाटूक चोर्‍या करायला लागला़  नंतर दुचाकी चोरीर्पयत त्याची मजल गेली़  काही चोर्‍या त्याला पचल्या़ शेवटी पोलिसांचे हात त्याच्यार्पयत पोहोचलेच; त्याला अटक झाली़ आई-बापांना कोर्टाच्या पायर्‍या चढाव्या लागल्या़  काही दिवसांनी कोर्टातून जामीन मिळाला़  थोडे दिवस तो शांत राहिला; पण शारीरिक घुसमट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती़  पुन्हा तो बस स्टँडवर घिरटय़ा घालायला लागला़  रोज बस स्टँडवर त्याच्या वार्‍या होऊ लागल्या; पण ती काही सापडत नव्हती़  कंटाळून तो घरी जायचा कधीतरी ती सापडेल या आशेऩे 
रोजच्यासारखा तो आजही कंटाळून घरी गेला़  तो गेल्यानंतर काहीवेळातच ती आली़  त्याच्याच मित्रासह. 
प्रेमात पोरांचं काय होतं कधीकधी याच्या कहाण्या सांगणारा एक तरुण दोस्त मला सांगत होता, ही ‘त्या’ एकाची गोष्ट.
दुसरा एक म्हणाला, ‘माझं नाव नको छापू; पण आपण स्वतर्‍च्या एक्सपिरिअन्सने सांगतो. पोरी भलत्या स्मार्ट. प्रेमाचं थ्रिल अनुभवायला, माफक ‘मजेला’ ना नसते त्यांची. त्यांना कळून चुकलंय की थोडं लालूच दाखवलं की पार खुळे होतात पोरं़  भाव तर देतातच काही येडे मोबाइल सीम आणि रिचार्जही मारून देतात. शायनिंग मारता येते आणि बोलता येतं तिच्याशी म्हणून हॉटेलात नेऊन जेवूखाऊ घालतात. पैशापायी काही शिडशिडे किडे तुरुंगवारीही करून येतात!’
दुसरा एक तरुण सांगतो, ‘पोरं पोरींच्या मागं लागतात़ हे खरंय. ती नाही म्हटली की नको ते घडून जातं़ हे पण खरंय; पण सापडले की मार पोरांनाच बसतो नि लोकं पार जातीपाती शोधत हाणतात ते येगळंच!’ 
***********
नगरमधील एक महाविद्यालय़ कट्टय़ावर पोरांचा घोळका़ अकरावी-बारावीची पोरं़ एकाच मोबाइलमध्ये डोकावून सारे काहीतरी पाहत होत़े आम्ही तेथे गेलो तर घपकन मोबाइल बंद़ सारे कावरेबावरे होऊन पहायला लागल़े आम्ही तेथून थोडे पुढे आलो तर पुन्हा ते मोबाइलमध्ये गुंग झाल़े 
पोरांच्या हातातून मोबाइल पहिला काढला पाहिज़े 
- माझ्यासोबत असलेला मित्र बोलला़ 
कॉलेजात भेटलेल्या एका कॉलेजकुमाराशी या विषयावर बोलणं झालं. त्यातला एक सांगत होता, मोबाइलनं सगळं वाटूळं करून ठेवलंय़ यांना जवळपास फुकटातच नेट पॅक मिळतो़ मग ही साइट ती साइट़ सोशल मीडिया़ यातून या पोरांचे मेंदू पार कावलेत़ हाती काहीच लागत नाही़ नुसती फॉरवर्डची ढकलगाडी खेळायला म्हणूनच मोबाइल वापरतात़ या मोबाइलमधून थेट गावातल्या झोपडीर्पयत बिप्यांचा साठा झिरपत जातो़ काहींनी त्यासाठी वेगळं मेमरीकार्डच केलेलं़ मग थोडा एकांत मिळाला की असे मोबाइलमध्ये डोके अडकून शरीर आक्रसून बसतात़ मग सुरू होते मोबाइलमधल्या त्या बाईशी कॉलेजातल्या पोरींची तुलना़ हिची साइज अशी़, तिची तशी़  या बिप्यांनी पोरांच्या डोक्यात पार किचाट झालाय़  कोणतीही पोरगी पाहिली की तिच्याकडे फक्त सेक्स टॉइज म्हणूनच हे पोरं पाहतात़  
तेवढय़ात दुसरा एकजण म्हणाला, ‘30 मिनिटे बिप्या पाहिल्या आणि नंतर सहज पापण्या पडल्या तरी समोर काय काय दिसतं. मोबाइलने खटक्यांचं प्रमाण लई वाढलंय.
खटके म्हणजे असं विचारलं तर म्हणाला,  मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप आलंय़ फेसबुक आलंय़ त्याच्यावर पोरी त्यांचे वेगवेगळे फोटो टाकतात़ पोरं ते फोटो पाहत बसतात़ तिचा सगळा अंदाज लावतात़ आणि मग एखाद्या दिवशी हळूच एक मेसेज पाठवतात़ त्याला उत्तर आलं की सुरू होतं चॅटिंग़ मग व्हिडीओ कॉल़ मग प्रपोज आणि नंतर पुढचं बरंच काही़ दुसर्‍या कुणी मित्रानं हे पाहिलं की त्यावरून राडे. लै किचाट होतोय.
**********
आजच्या पोरांना भावना, प्रेम, शारीरिक आकर्षण यात फरक करता येत नाही़, अशी चर्चा असते. तरुण मुलांशी बोललो आणि विचारलं की तुला जी मुलगी आवडते ती का आवडते?
तर उत्तर एकच, ती दिसायला भारी आह़े गोरी आह़े  बाकी तिचे गुण, कौशल्य, हुशारी असं काहीच न पाहता फक्त दिसणं त्यांना आवडतं़ म्हणजेच हे शारिरीक आकर्षण असतं़ मग तिला गठवणं हेच थ्रिल वाटतं. या ‘थ्रिल’चा कीडा जसा पोरांना चावतो. त्यातून प्रेमप्रकरण जमतं. फिरणं सर्रास होतं; पण समजा भांडं फुटलं, नको तो घोळ झाला, मारझोड झालीच, घरच्यांनी विरोध केला आणि आर या पार करण्याची वेळ आली की मात्र अनेक पोरी पलटतात. लपतात आईबापाच्या पदराआड असं अनेक मुलं सांगतात. त्याच्या बर्‍याच कहाण्या आहेत, त्यांच्याकडे. पोरगा मात्र मार खातो आणि असेल नसेल ती लायकीही गमावून बसतो़ प्रसंगी पोलीस लॉकअपमध्ये जातो़ मुलीनच फसवलं ही मनातली गाठ वाढत जात़े रागाचा पारा चढत जातो़ नियंत्रण सुटतं़ त्यातून होणारा राडा वेगळाच़ (साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)

 

Web Title: what happens when young rural boy falls in love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.