शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

यूएईचं हे ‘होप मिशन’ मंगळावर  करणार  स्वारी , ३३ वर्षीय  तरुणीकडे  मोहिमेचं  नेतृत्व   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 4:58 PM

संयुक्त अरब अमिरात या देशानं मंगळ मोहीम आखली आहे. आणि त्याचं नेतृत्व करतेय एक तरुणी. मंगळावर यानासहच महिलांना नेतृत्व म्हणूनही ही मोहीम महत्त्वाची आहे.

ठळक मुद्देमिशन होप

कलीम अजीम

चालू वर्षात तीन यान मंगळावर जाणार आहेत.त्यातला एक दुबईचा असेल. यूएईचं हे ‘होप मिशन’ आहे.आणि त्याची डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर एक 33 वर्षीय तरु णी आहे. सारा अल् अमिरी असं तिचं नाव. दुबईची यूथ आयकॉन असलेली ही युवती जगासाठी एका अंतराळ मोहिमेची प्रमुख म्हणून काम करत आहे.भारत, अमेरिका, रशिया आणि युरोपनंतर मंगळ ग्रहावर जाणारा दुबई चौथा देश आहे. त्यातही अरब देशातला पहिलाच असावा. या मंगळयान मिशनची सर्व जबाबदारी सारा अमिरी या स्पेस सांयटिस्ट तरुणीकडे आहे. महिलांसंदर्भात परंपरावादी विचार एकीकडे, दुसरीकडे चंगळवादाचा जागतिक बाजार उभा करणारा देश अशी दुबईची ओळख आहे.त्या देशानं एका तरुणीवर एवढी मोठी जबाबदारी सोपवणं हाच जगभरात चर्चा विषय आहे. स्पेस डॉट कॉम या वेबसाइटनं म्हटलं आहे की, सर्व मुस्लिम देशांसाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट आहे. मात्र अमिरातीज विमेन या पोर्टलने केलेल्या  बातम्यांतून साराविषयी अधिक माहिती समजते. 1987 साली जन्मलेल्या साराला शालेय वयापासून स्पेस सायन्सची आवड होती. त्यांनी शारजाहमधील अमिराती युनिव्हर्सिटीमधून कॉप्युटर सायन्समध्ये डिग्री मिळवली आहे. स्पेस सायन्समध्ये करिअर निवडले. विशेष म्हणजे त्यावेळी दुबईमध्ये कुठलाही खगोल कार्यक्रम नव्हता.खलिज टाइम्स म्हणते की, व्यवसायाने स्पेस वैज्ञानिक असलेल्या सारा यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केलं आहे. शिवाय दुबईस्थित मुहंमद बिन राशिद स्पेस सेंटरमध्ये इंजिनिअर म्हणूनही सेवा दिली आहे. इथूनच त्यांची 2क्17 साली कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे अॅडवान्स्ड सायन्स मंत्रलय सोपवण्यात आलं. मंत्रिमंडळात सामील असलेल्या नऊ महिलांमध्ये कमी वयाच्या सारा एकमेव होत्या.मंत्रिपदानंतर बहुप्रतिष्ठित टेड टॉकने त्यांना मंगळ मोहिमेवर बोलण्यास आमंत्रित केलं. त्या कार्यक्र मात त्यांनी उच्चारलेलं एक विधान फार महत्त्वाचं आहे. त्या म्हणतात, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करता, हे लक्षात येतं की आपल्याला ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेकडे जाण्याची गरज आहे. या अर्थव्यवस्थेचा पाया सायन्स व टेक्नॉलॉजी असून, त्याची निर्मिती करणं आवश्यक आहे. ’दुबईत स्पेस सेंटरची स्थापना झाली त्यावेळी कुठला ठोस कार्यक्रम सरकारकडे नव्हता. 2क्14 साली सेंटरने स्पेस कार्यक्रम घोषित केला. साहजिकच त्या प्रकल्पासाठी सारा यांची निवड करण्यात आली.गल्फ न्यूजच्या मते, कालांतराने मंगळावर यान पाठवण्याची कल्पना सारा आणि त्यांच्या टीमने मांडली. संस्थेकडे पुरेसे तंत्रज्ञान नसल्याने ते आयात करणो जिकिरीचं होतं. सेंटरने भूमिका घेतली की तंत्रज्ञान विकत घेणार नाही. संस्थेचं म्हणणं होतं की, ते इथंच तयार करावं. ही जबाबदारी सारा अमिरी व त्यांच्या टीमनं स्वीकारली.सहा वर्षे अथक परिश्रमातून हे ‘मिशन’ पूर्ण झालं. सारा म्हणतात, त्याप्रमाणो त्या आणि त्यांची टीम रोज 12 तास काम करत होती. संपूर्णत: मानवरहित असलेल्या रॉकेटचं नाव ‘अल-अमल’ म्हणजे उमेद असं आहे. 

स्पेस डॉट कॉमच्या मते, हे बहुचर्चित यान मंगळावर हवामान आणि वातावरणाचा अभ्यास करणार आहे. शिवाय हायड्रोजन आणि ऑक्सिजनचादेखील शोध घेणार आहे. होप रॉकेटचं वजन 15क्क् किलोपेक्षा जास्त आहे. यानाच्या एका बाजूला बसविलेलं इन्स्ट्रमेंट त्याला अंतराळ घेऊन जाणार आहे. सारा म्हणतात, अंतराळात 5क् कोटी किलोमीटरचा प्रवास करण्यास या रॉकेटला सात महिने लागणार आहेत. 2क्21 साली फेब्रुवारीत ‘मिशन होप’ आपल्या कक्षेत जाऊन निश्चित कामाला सुरुवात करेल. ज्यात धुलीकण आणि ओझोनचा अभ्यास प्रमुख कार्य आहे. जापानच्या तनेगाशिमा बेटावरून हे रॉकेट अंतराळात कूच करणार आहे.अवकाश कार्यक्रम व यानाचे उत्पादन व डिझाइनचा दुबईकडे अनुभव कमी आहे. त्यामुळेच सारा व त्यांच्या टीमच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात आलेलं दुबईचं स्वप्न जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.सारा म्हणतात, ‘मिशन होपमध्ये सामील होणं माङयासाठी प्रतिष्ठेची आणि अभिमानाची बाब आहे.’ विशेष म्हणजे दुबईच्या या मार्स मिशन मोहिमेतील 15क् वैज्ञानिकांत 34 टक्के महिला आहेत. याबाबत सारा म्हणतात, ‘ही महत्त्वाची बाब आहे की या मिशनच्या लीडरशिपमध्ये पुरु ष आणि महिलांना बरोबरीचे स्थान आहे. आम्हा महिलांसाठी हे काम उत्साह वाढवणारं होतं. आमचा हा प्रकल्प त्या महिलांसाठी दिशादर्शक आहे, ज्या भविष्यात काहीतरी करण्याचा मानस बाळगून आहेत.’वास्तविक, फार्मसी, गणित, तर्कशास्र, तत्त्वज्ञान या ज्ञानपरंपराशिवाय खगोलशास्नतही अरबांचे मोठे कर्तृत्व राहिलेलं आहे. अल जङिारा व टाइमलाइन सिरीजने यावर महत्त्वाच्या डॉक्युमेंटरी केलेल्या आहेत. मंगळ ग्रहाची सफर जगभरातील मानवासाठी कल्पनाविश्वाचा विषय राहिलेला आहे. प्रत्येकजण तिथं जाण्याचं स्वप्न रंगवत असतो. काही टुरिस्ट कंपन्यांनी प्रलोभनं देऊन या ग्रहाची सफर घडविणारे स्पेशल पॅकेजही घोषित केले होते.   अर्थात ते सारं नंतर.. आता दुबईतून एका तरुणीच्या नेतृत्वासह निघालेलं हे आशेचं यान जास्त उमेद देणारं आहे.

 

(कलीम मुक्त पत्रकार आहेत)