शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

टाइम मॅनेजमेण्ट घिसापिटा पचका

By admin | Updated: February 26, 2015 21:09 IST

आपल्या वेळा न पाळण्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, नवीन कामं देत नाहीत आणि उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल येऊन चिकटतं!

 आपल्या वेळा न पाळण्यामुळे लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत, नवीन कामं देत नाहीत 

आणि उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल येऊन चिकटतं!
करिअर मार खातं ते इथंच!
 
 
खरं तर आजच्या कार्पोरेट जगात ‘टाइम मॅनेजमेण्ट’ या शब्दाइतका रटाळ आणि घिसापिटा विषय दुसरा कुठलाच नाही. प्रत्येकजण या विषयावर बोलतो, तर दुस:याला लेक्चर देतो. अनेकांच्या तर अॅप्रायझलवर पण लिहिलं जातं की, टाइम मॅनजमेण्ट हा विषय कच्चा आहे. 
पण जगभरातला सॉफ्ट स्किलचा अभ्यास सांगतो की, टाइम मॅनजमेण्ट नावाचं सॉफ्ट स्किल्स शंभर टक्के जमलं, उत्तम जमलं. एकदम एक्सलण्ट, अशी माणसं फार दुर्मीळ आहेत. कारण हे स्किलच असं आहे की, कितीही शिका, त्यात चुका होतातच. अपडेट करावंच लागतं.
खरंतर अनेक बाकीच्या गोष्टी उत्तम जमूनही केवळ वेळ व्यवस्थापन जमत नाही म्हणून अनेक माणसं मागे पडतात. त्यांचा परफॉर्मन्स घसरतो. कामांचा बोजा एकदम त्यांच्या मानगुटीवर येऊन बसतो. आणि कामं तुंबली की आपली कशी फजिती होते, किती खोटं बोलावं लागतं, किती लबाडय़ा कराव्या लागतात याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलेला असतोच.
हे जेव्हा आपल्यापुरतं असतं तेव्हा निभावलं जातं, पण आपल्या वेळा न पाळण्यामुळे आपली इमेज हळूहळू घसरायला लागते. लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तुम्हाला कामं देत नाहीत आणि आपण उत्तम काम करूनही ‘बेभरवशाचे’ असं लेबल लागतं!
जे चटकन जात नाही आणि त्यातून अनेकांना चांगल्या कामाच्या संधी गमवाव्या लागतात. कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत, साचतात, लोकांशी खोटं बोलावं लागतं यातून अनेकजण डिप्रेशनमधे जातात.
असं डिप्रेशन टाळायचं आणि ‘आपलंही असंच होतं’ असं न म्हणता, आपण हे आपल्याठायी नसलेलं स्किल शिकण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. तरच कदाचित आपल्याला वेळा पाळणं आणि वेळा गाठणं जमू शकेल!
 
1) तुम्हाला प्रायॉरिटी ठरवता येते का?
म्हणजे विचारा स्वत:ला की, याक्षणी महत्त्वाचं काय? कुठलं काम तातडीचं, कुठलं कमी तातडीचं, कुठलं शेवटी करता येईल, अजिबात सेण्टी न होता, कोण काय म्हणोल याचा विचार न करता, आपलं काम सोडून इतरांच्या मदतीला न धावता आधी आपल्या कामाची प्रायॉरिटी अर्थात प्राधान्यक्रम ठरवा.
2) आपल्याला मारे वर्ल्डकप जिंकायचा असेल, आपलं लक्ष्य तेच असेल, पण आजची मॅच तर जिंकावी लागेल. म्हणजे आजचा विचार करायला पाहिजे. त्यातही एकूण मॅचचं ओझं डोक्यावर ने घेता, आहे ती ओव्हर, आहे त्या चेंडूवर स्कोअर एवढं तरी आपण ठरवू शकतोच. तसंच तुमच्या कामांचही. म्हणजे काय तर  तुमचे अल्पकालीन ध्येय ठरवा. ती राहू द्या डोक्यात. पण तरीही रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी आपली आजची कामं काय काय हे कागदावर लिहून काढा आणि त्याची प्रायॉरिटी ठरवा. 
3) हे असं केलं तर कामं डोळ्यासमोर राहतात, विसरलो असं म्हणता येत नाही आणि किती काम झालं हे लक्षात येतं. एकदा ही एका दिवसाची सवय झाली की मग आठवडय़ाचं, महिन्याचं नियोजन करा. करून पहा, तुमची कामं हळूहळू वेळेत पूर्ण व्हायला लागतील.
 4) पण या नियोजनात दोन आपले महत्त्वाचे शत्रू. एक म्हणजे इमेल-इंटरनेट आणि आपला मोबाइल फोन. आपण मारे कामं ठरवतो पण एकदा ऑनलाइन गेलो, एखादा फोन आला की त्यात किती वेळ जातो याचं आपल्याला भानही उरत नाही. त्यावर सोपा उपाय, कामाला सुरुवात करतानाच पाच मिण्टं ईमेल चेक करायच्या, महत्त्वाच्या ईमेल्सना चटकन उत्तर द्यायचं आणि तत्क्षणी लॉगआऊट करायचं. तेच फोनचंही. सायलेण्टवर करून ठेवायचा. दर दोन तासांनी एक मोबाइल ब्रेक घेऊन काही आवश्यक नाही ना, हे तपासता येतं. आलेली प्रत्येक ईमेल आपण लगेच वाचलीच पाहिजे, प्रत्येक एसएमएस, प्रत्येक व्हॉट्स अॅपला लगेच रिप्लाय दिलाच पाहिजे असा काही नियम नाही. तुमचा असेल तर तो तुम्हीच मोडून टका.
5) अनेकजण टाइमटेबलच असं आखतात, इतकं स्वत:ला बांधून घेतात की ऐनवेळची कामं, कामातल्या अडचणी यांना जागाच ठेवत नाहीत आणि असं झालं की सगळं वेळापत्रक कोलमडतं. तसं न करता, दिवसाला ङोपतील तेवढीच कामं अंगावर घ्या.
6)  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मान्य करा की, आपण बोलतो फार पण टाइम मॅनेजमेण्ट आपल्याला जमत नाहीच हे मान्य करून एकेका कामाची वेळ पाळणं, ठरलेली कामं पूर्ण करणं हीच शिकण्याची पहिली पायरी! आपण ती एक पायरी तरी आधी चढूच..