शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Think b4 U throw

By admin | Updated: February 5, 2015 19:06 IST

हल्ली सगळ्यांचे विकेण्ड प्लॅन अगोदरच ठरलेले असतात. पार्टी-पिकनिक-सिनेमा-ट्रेकिंग नाही, तर मस्त झोपा काढणं

 प्राजक्ता ढेकळे - 
 
फेकण्यापूर्वी विचार करा असं सांगत स्वच्छता मोहीम राबवणारा पुण्यातला एक ग्रुप
 
हल्ली सगळ्यांचे विकेण्ड प्लॅन अगोदरच ठरलेले असतात. पार्टी-पिकनिक-सिनेमा-ट्रेकिंग नाही, तर मस्त झोपा काढणं. अनेकांचा रविवार तर दुपारपर्यंत झोपून उठणे, मग जेवणे मग पुन्हा झोपणे याच एका तत्त्वावर आधारलेला असतो. 
पण हे सारं बाजूला ठेवून पुण्यातली काही २0-२२ वर्षांची मुलं एक खास उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे. 
त्या प्रय्नाचं नाव आहे,‘थिंक बीफोर यू थ्रो’.  मिहीर भोपळे आणि त्याचे मित्र, कट्टय़ावर गप्पा मारता मारता त्यांना सुचलेली ही कल्पना. सुटीच्या दिवशी शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी जाऊन तिथला कचरा उचलून सफाई करण्याचं काम ते करतात. मिहीर एक अनुभव सांगतो, ‘एकदा आम्ही कट्टय़ावर बसलो होतो. आमच्या समोर एक कपल बसलं होतं. त्यांनी काय काय खाल्लं आणि कागद तिथंच टाकून निघून गेले. आम्हाला वाटलं की, त्यांना सांगावं, इथं कचरा टाकू नका, घेऊन जा, डस्टबीनमध्ये टाका; पण आमच्यापैकी कुणाचं धाडसच झालं नाही. कारण आम्ही तरी वेगळं काय करत होतो? खायचं तिथचं कचरा फेकायचा, त्यामुळं इतरांना काही सांगण्यापेक्षा स्वत:पासून सुरुवात करायचं ठरलं. आणि या कामाला सुरुवात केली. म्हणून मग आम्ही आमचा पहिला क्लिनलिनेस ड्रायइव्ह पुण्याच्या संभाजी बागेतच केला.’
पहिल्या दिवशी ते फक्त चार ते पाच जण होतो. पण त्यांचीही भीड चेपली आणि मग आपल्या कामाविषयी त्यांनी इतर मित्र-मैत्रिणींना सांगायला सुरुवात केली. जे तयार झाले त्यांना घेऊन व्हॉट्स अँपवर एक ग्रुप तयार झाला. फेसबुकवरही थिंक बीफोर युू थ्रोचे पेज त्यांनी बनवलं. त्यातून अनेक माणसं जोडत गेली आणि मग पुण्याच्या फेमस एफसीरोडवरही त्यांनी जोरदार स्वच्छता केली.
आर्किटेक्ट, इंजिनिअर असलेली ही उच्चशिक्षित मुलं असं स्वत:हून काम करतात याचं अनेकांनी अप्रूप वाटून अगदी लहान मुलं, आजोबाही स्वत:हून त्या मोहिमेत सहभागी होऊ लागली. आजपर्यंत त्यांनी शहरात असे १६ क्लिनलिनेस ड्राइव्ह केले आहेत.
 
 
‘‘ शहरातला कचरा हा  प्रॉब्लेम नसून कचरा वर्गीकरण हा मुख्य प्रॉब्लेम आहे, असं आता आमच्या लक्षात आलं आहे. म्हणून आम्ही आता विविध ठिकाणी जाऊन कचरा वर्गीकरणाविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. ’’
- अमृता जोशी
 
‘‘या स्वच्छता मोहिमेमुळे स्वत:लाही एक चांगली सवय लागली. आता चहाचा प्लॅस्टिकचा कपही आम्ही रस्त्यावर टाकत नाही आणि इतरांना टाकू देत नाही. ज्याठिकाणी मोहीम राबवली त्या भागातल्या चहाच्या टपर्‍या, फूड स्टॉल या सर्वांना आपला कचरा वर्गीकरण करून वेगळा टाका असं आम्ही चारचारदा बजावतोय.’’ 
-तन्मय ब्रम्हे