शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘टेक-टुमारो’

By admin | Updated: January 29, 2015 15:39 IST

भविष्यातल्या टेक्नॉलॉजीनं जगणं कसं बदलेल, हे सांगणारं एक खास टूल

भविष्यातल्या टेक्नॉलॉजीनं जगणं कसं बदलेल, हे सांगणारं एक खास टूल
 
 
या वर्षभरातच आपला टेक्नॉलॉजी वापराचा अनुभव बदलून जाईल, ते ही इतक्या वेगानं की,
जे आज नवीन आहे,ते उद्या जुनं ठरेल. फ्युचर २0१५
 
 
 
गेल्या दशकात डिजिटल तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात प्रचंड बदल झाले. बरं गेल्या दशकात म्हणावं तर तेही तितकंसं बरोबर नाही. खरं म्हणजे गेल्या दोन वर्षात म्हटलं तरी चालेल. फेसबुकचं उदाहरण घ्या. २00४ मध्ये सुरू झालेल्या या सोशल नेटवर्कने मायस्पेस आणि ऑकरूटला अक्षरश: खाऊन टाकलं. आता मात्र अशी परिस्थिती आहे की, व्हॉट्सअँपशिवाय आपले पानही हलत नाही. त्यात मोबाइलचा राजा ठरलेल्या नोकियाचे नामोनिशाण पुसले गेले. सॅमसंग एकदम जोमात म्हणेपर्यंत आणखी दहा दावेदार निर्माण झाले. 
हे सारं पाच-दहा वर्षात बदललं, यावर विश्‍वास बसणार नाही अशी  स्थिती आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा हा सगळा वेग अचंबित करणारा आहे. आज जे आहे ते म्हणता म्हणता जुनं होतं आणि ज्याला फ्युचर टेक्नॉलॉजी म्हणू या, ते एकदम आयुष्यात ताजं म्हणून येतं. हा वेग समजून घ्यायचा तर येत्या काहीच दिवसात काय बदलणार आहे, याची ही एक धावती झलक.
१) स्मार्टफोन : २0१५ मध्ये अँण्ड्रॉइड आयफोनवर चांगलीच आघाडी घेण्याची शक्यता आहे. अँप्सफिगर्स या कंपनीकडील माहितीनुसार उपलब्ध असलेल्या एकूण अँप्सच्या संख्येत गूगल प्ले स्टोअरने आयट्यून्सला नुकतंच मागं टाकलं आहे. अँप्सच्या डाउनलोडच्या बाबतीतही अँण्ड्रॉइड आयफोनवर वरचढ आहे. याचा परिणाम म्हणजे अँप्स् डेव्हलपर्सची पसंती हळूहळू अँण्ड्रॉइडला मिळणार हे निश्‍चित. 
दुसर्‍या बाजूला चिनी आणि भारतीय कंपन्यांनी मोठय़ा पाश्‍चिमात्य कंपन्याची गणिते बिघडवायला सुरुवात केली आहे. शाओमी (Xiaomi), वनप्लस या चीनमधील तर आपल्या स्वदेशी मायक्रोमॅक्सने उच्चदर्जाचे स्मार्टफोन कमी किमतीत विकता येतात हे दाखवून दिलं आहे. अतिशय कल्पक वितरणव्यवस्था वापरून या कंपन्या उत्तम दर्जाचे मोबाइल भारतासारख्या बाजारपेठेत विकत आहेत. डिसेंबरमध्ये शाओमीच्या Redmi Note 4G  या मॉडेलचे ४0,000 फोन्स फ्लिपकार्टवरून अवघ्या ६ सेकंदात विकले गेले. ही गोष्ट तुमच्या-माझ्यासारख्या गॅझेटवेड्यांसाठी पर्वणीच असणार आहे. 
२) इ-कॉर्मस 
 फ्लिपकार्ट, अँमेझॉन यासारख्या मोठय़ा कंपन्यांपासून ते बिगबास्केट या किराणा विकणार्‍या कंपनीपर्यंत या कंपन्यांनी भारतातील ग्राहकजगतात क्रांती केली आहे. २0१५मध्ये या कंपन्यांचे लक्ष असेल ते मोबाइल कॉर्मसकडे. मोबाइलवरून खरेदी अधिकाधिक सुलभ कशी होईल यावर या क्षेत्रातील कंपन्यांचा भर असणार आहे. त्यामुळे या वर्षात आपल्याला मोबाइल वॉलेटची पद्धत रूढ झालेली बघायला मिळेल. Paytmसारखी कंपनी या क्षेत्रात अग्रगण्य असून, या कंपनीची सेवा वापरणार्‍यांची संख्या भारतातील क्रेडिट कार्डधारकांपेक्षा जास्त आहे. सध्या मोबाइल वॉलेटमधून फक्त ऑनलाइन व्यवहारच करता येतात. त्याशिवाय या वॉलेटमध्ये जमा करता येणार्‍या रकमेवरही रिझर्व बँकेच्या र्मयादा आहेत. हे नियम शिथील झाल्यास आपल्याला व्यवहारासाठी एक सोयिस्कर मार्ग उपलब्ध होईल. 
३) डिजिटल इंडिया : भारतातील जवळपास ७४ टक्के लोक मोबाइल वापरतात. ही संख्या टीव्ही किंवा कॉम्प्युटर-लॅपटॉप वापरणार्‍यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. याच गोष्टीचा वापर करण्याच्या आता भारत सरकारनं ठरवलं  आहे. मोबाइल हे नागरिकांच्या सक्षमीकरणाचे साधन मानून शासनाच्या अधिकाधिक सेवा मोबाइलद्वारे पुरवण्यासाठी सरकारनं डिजिटल इंडिया हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. २0१९ सालापर्यंत प्रत्येक भारतीयाकडे मोबाइल असेल आणि मोबाइलद्वारे शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि इतर शासकीय सेवा नागरिकांना मिळाव्यात या दिशेने या योजनेची वाटचाल सुरू झाली आहे. या सेवा मोबाइलद्वारे पोहोचवण्यासाठी शासन दोन गोष्टींमध्ये मोठी गुंतवणूक करेल. एक म्हणजे ब्रॉड-बॅण्ड इंटरनेट याला माहितीचा महामार्ग मानून रस्त्यांप्रमाणेच इंटरनेटच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती होईल. दुसरे म्हणजे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत मोबाइल हॅण्डसेट भारतात बनवण्यास सरकार चालना देईल. 
४) स्ट्रीम, डोण्ट् स्टोअर 
एक महत्त्वाचा बदल आपल्याला दिसेल तो करमणुकीच्या क्षेत्रात. मोबाइलवर गाणी ऐकणं किंवा चित्रपट बघणं यासाठी या फाइल्स फोन किंवा कॉम्प्युटरवर स्टोअर करण्यापेक्षा त्या इंटरनेटवरून स्ट्रीम करणं हे कमी कटकटीचं ठरेल. gaana.com, saavn.com, rdio.com या गाण्यांसाठी साइट्स आणि त्यांचे अँप्स् किंवा व्हिडिओ / चित्रपटांसाठी Youtube.in, boxtv.cm यासारख्या सेवांचा वाढलेला प्रसार २0१५ मध्येच पहायला मिळेल. 
 
गणेश कुलकर्णी
तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याविषयाचे अभ्यासक