शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कझाकबॉय हरता हरता जिंकणारी एक जिद्दी लढाई

By admin | Updated: April 12, 2017 16:10 IST

जिद्द ही एक कमाल गोष्ट आहे !

जिद्द ही एक कमाल गोष्ट आहे !

एखाद्या माणसाची जिद्द, जे काम करतो आहोत यावर पूर्ण विश्वास, आणि त्याबरोबर आपल्याला हवं ते गाठण्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी असेल ना तर आपल्याला काहीही म्हणजे काहीही अशक्य नाहीये! चिकन सूप फॉर द सोल, किंवा ते ‘यू कॅन विन’ सारखं जरा उपदेशात्मक वाटतं ना हे वाचून. पण हा व्हिडीओ पाहा. तसा साधाच वाटतो पहिल्यांदा पाहिल्यावर. यात कझाकिस्तानमधल्या एका शाळेतली मुलं आहेत. आपल्याकडे शाळांत स्पोर्ट्स डे वगैरे असतो ना तसं तत्सम काहीतरी सुरू आहे त्यांचं. म्हणून हा व्हिडीओ कोणाच्या तरी आई-किंवा बाबानं शूट केल्यासारखा वाटतो. एक रस्सीखेचचा सामना सुरू होतो. यात दोन गट आहेत. एक लाल, तर एक हिरवा. सुरुवातीला अगदी साधा सामना सुरू होतो. दोन्ही गट सारख्या शक्तीचे वाटतात. दोन्हीही गटातली मुले अगदी जीव खाऊन दुसऱ्या गटातल्या एकेकाला बाद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. हळूहळू यामधला हिरवा गट जरा वरचढ ठरू लागतो. तो लाल गटाचा एक-एक गाडी बाद करून अगदी जिंकणार असं वाटतं. मात्र लाल गटातला रांगेत अगदी मागे असलेला मुलगा खूप खूप ताकद लावताना दिसतो. त्याच्या प्रयत्नांना यश येईल असं काही वाटत नाही. हा सामना लाल गट हरणार असंच आपल्याला वाटतं पण हळूहळू चित्र बदलायला लागतं. या मुलाचे प्रयत्न सुरूच. नुसते सुरू नाही तर ते वाढतच आहेत. तो मागे असलेला छोटुकला मुलगा आता पुढे येतो आणि पूर्ण ताकदीनिशी जोर लावतो. जणूकाही त्याचं सारं आयुष्य या खेळातल्या जिंकण्या किंवा हरण्यावर अवलंबून आहे. हळूहळू खेळ बदलायला लागतो. हिरव्या गटाचा एकएक गडी बाद व्हायला लागतो. आणि शेवटी हा छोटुकला मुलगा त्यांच्या गटाला जिंकवतो. तो अक्षरश: सुटकेचा नि:श्वास टाकतो! तो जिंकल्यावरचा त्याचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहताना वाटतं की आपण ना बऱ्याच वेळेला आपले विरोधक किंवा इतर कोणतीही माणसं आपल्यापेक्षा वरचढ आहेत असंच मनात घेऊन बसतो. कित्येकदा कोणतं आव्हान पेलण्याआधीच नको नको करतो! म्हणून अशा वृत्तीने आपण अनेकदा मैदानात उतरण्याआधी मनातूनच हरलेलो असतो. सांगाल मनातून हरलेला माणूस प्रत्यक्षात जिंकू शकेल का? इंटरनेट कमाल चीज आहे यार, कोण कुठली माणसं आपल्याला एका छोट्या कृतीमधून काय काय शिकवून जातात ! एका छोट्याशा गावातल्या, छोट्याशा मुलाचा हा छोटा व्हिडीओ. पण केवढं काय काय शिकवून जातो आपल्याला! यूट्यूबवर ‘कझाकबॉय, टग आॅफ वॉर’ असं शोधा किंवा हा व्हिडीओ नक्की पाहा- https://www.youtube.com/watch?v=eUAbGmtbw4M

- प्रज्ञा शिदोरे pradnya.shidore@gmail.com