शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘तसलं’ पहायचा नाद

By admin | Updated: February 19, 2015 20:38 IST

फॉरवर्ड होत आलेले व्हिडीओ ते पोर्नोग्राफी साईट्स हे पहायचं व्यसन लागलं, तर जगण्याचं भान सुटतंच.

इंटरनेट व्यसनाबद्दल बरीच माहिती मला मुक्तांगणामध्ये मिळाली होती; पण माझ्या मनात कुतूहल होतं की, इंटरनेट किंवा स्मार्टफोनचं  व्यसन ज्यांना लागलं ते नेमकं करतात काय?
म्हणजे नेमकं हे व्यसन लागलं की, माणसं कशासाठी इतकी पिसाटतात. साधारण अंदाज होताच की, सोशल मीडिया वापरणं, चॅटिंग करणं असं काही तरी करत असतील? पण काहीजण गेमिंग, इंटरनेट जुगार याच्याही अधीन होतात. पण हे एवढंच की, आणखी काहीतरी करतात?
प्रश्न होताच.  मुक्तांगणच्या रिसेप्शनवर वायंगणकर सर बसले होते. त्यांना विचारलं तर ते म्हणाले,  कानिटकर आहेत. त्यांना थोडा वेळ आहे का, ते विचारतो. 
थोड्या वेळानं महेंद्र कानिटकर भेटले. म्हणाले, माझा अध्र्या तासाने एक ग्रुप आहे; पण तुम्हाला माझ्या परीने माहिती देतो. समोरच्या केबिनमध्ये आम्ही जाऊन बसलो. 
 मी इंटरनेटच्या व्यसनाबद्दल नीरज आणि संदीपसर यांच्याकडून माहिती घेतली आहे; पण मला अजून काही प्रश्न आहेत? माझी शंका अशी आहे की, ‘‘इंटरनेटचं व्यसन असलेली मंडळी नेमकं काय पाहतात? त्यात पोर्नोग्राफीचा वाटा किती असतो?’’- मी विचारलं.
‘‘टक्केवारी किती असेल हे सांगणं कठीण आहे. कारण अधिकृतरीत्या अजून यावर खूप संशोधन झालेलं नाही. मानसिक आजारांचे वर्गीकरण करणार्‍या नवीन आवृत्तीमध्ये या प्रकारच्या व्यसनाला अजून स्थान नाही. संशोधनाअभावी, अजून पुरेशी माहिती हाताशी नाही म्हणून या व्यसनाचे वेगळे वर्गीकरण करता येणार नाही असा निष्कर्ष काढला गेला; परंतु अशा प्रकारची व्यसनं वर्तन विकृती भागात मोडून शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबद्दल अजून मनोविकारतज्ज्ञामध्ये बरीच मत भिन्नता आहे. 
मात्र, तुम्हाला आमच्याकडे आलेली एक केस सांगतो.
साधारणपणे तिशीच्या एक  बाई आल्या होत्या. त्या महिलेची कहाणी अशी होती की, गेली दोन-तीन वर्षे पतीच्या वागण्यात हळूहळू फरक दिसू लागला होता. त्याच्या शरीर संबंधाच्या कल्पना बदलू लागल्या होत्या. अचानक त्याला वेगवेगळे सेक्स गेम खेळणं पसंत पडू लागले. तिनं ते काही दिवस सहन केलं; परंतु काही दिवसांत तिच्या लक्षात आलं की, तिचा नवरा काहीतरी विचित्र वागतो आहे.
पुढे तो ज्या काही विचित्र मागण्या करू लागला तेव्हा तर तिला त्याची कमालीची घ्रृणा वाटली. ती सांगत होती की, रात्री अकरा-अकरा वाजेपर्यंत तो फोनमध्ये डोके घालून असतो आणि फोन बंद केला की, माझ्यावर तुटून पडतो आणि एक दिवस तिला समजले की, तो फोनवर काहीतरी घाणेरडे बघतो आणि तसं तिला करायला लावतो.
एक दिवस त्याच्या नकळत तिनं फोन बंद करून लपवून ठेवला. त्याची प्रचंड घालमेल होत होती. फोन किमती होता त्यामुळे लगेच नवा फोन मिळणं शक्य नव्हतं. तो इतका निराश झाला की, ती स्वत:हून जवळ गेली तरी त्याला कशातच रस नव्हता.
तिनं जी लक्षणं सांगितली ती व्यसन या शब्दाशी निगडित होती. अतिरिक्त वापर, जबाबदारीचं भान न राहणं, वर्तनात लक्षणीय बदल आणि ती गोष्ट मिळाली नाही, तर होणारी तडफड या गोष्टी ‘व्यसन’ याच प्रकारात मोडतात. तिचा पती रात्री पोर्न पाहत असावा. त्या पत्नीनंही प्रत्यक्षात आणाव्यात असं त्याला वाटू लागलं होतं. जे भयंकर होतं. चमत्कारिक गोष्ट होती.
पण, यावर उपाय काय?
थोडक्यात सांगायचं तर मंत्रचळेपण या विकार प्रकारात त्याला समाविष्ट करता येईल. आणि त्याला वर्तनातील बदल घडवून आणणारी उपचार प्रणाली वापरावी लागेल.  जे दिसतं तसं काही नसतं हे भानच सोडणारी ही घातक वर्तन विकृती आहे; मात्र आपण या व्यसनात आणि पुढं विकृतीत अडकतोय हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.
 
 
> मेंदूचं सुटतं नियंत्रण
 
पोर्न साइट्स सतत पाहून-पाहून काय होतं?
खरंतर याचा संबंध फक्त पाहण्यापुरता र्मयादित नाही. याचा मेंदूतील रसायनांशी संबंध आहे.
कोणत्याही व्यसनांमध्ये मग ती दारू असो की, ड्रग्ज ज्या रितीने मेंदूतील रसायनांची गडबड होते त्याच रितेने ही गडबड होत असते. मेंदूला रिवॉरड रचनेत जसे पदार्थांमुळे बदल घडतात तसेच बदल दिसून येतात.
प्रामुख्याने चिंताविकार, नैराश्य, अनिवार, उध निर्माण करणारी रसायनं यांचा त्यात समावेश होतो.
मेंदूचा जो भाग अमली पदार्थ दारू किंवा कोकेनसारख्या व्यसनांनी प्रकाशित होतो त्याच धर्तीवर मेंदूत बदल घडतात.
त्यामुळे आपल्याला व्यसन लागलंय आणि आपलं वास्तवाचं भान सुटतं आहे, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही!
---------------------