धुंद पाऊस, कणीस आणि...

By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:43+5:302016-06-30T12:34:43+5:30

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात..

Rainfall, Rainfall and Rainfall ... | धुंद पाऊस, कणीस आणि...

धुंद पाऊस, कणीस आणि...

-भक्ती सोमण

पावसाळ्याला नुकतीच कुठे सुरवात झाली आहे. या पावसाळ्या च्या कुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट आॅप्शन असला तरी खरी गंमत आहे ती गरमागरम कणीस खाण्यात...
मनाशी चित्र रंगवून बघा. पाऊस खूप कोसळतोय, याक्षणी आवडत्या व्यक्तीबरोबर नाहीतर मित्र-मैत्रिणींबरोबर बाईक काढून लॉंग ड्राईव्हला जायचं. माळशेज, लोणावळा,खंडाळा अशा कितीतरी ठिकाणी तर पाऊसाबरोबरच धुकेही पसरलेले असते. त्यामुळे तो गारवा मनाला आल्हाददायक करतो. तृप्त करतोच करतो. यात खरी मजा येते ती कणीस खायला. पावसाचा आनंद लुटत असताना तिथल्या ठेल्यांवर कणीसवाले बसलेले असतात. शेगडीवर कणीस भाजताना ती गरम वाफ हवीहवीशी वाटते. मग ते भाजलेले कणीस, त्यावर मीठ, लिंबू, तिखट पेरून जी मजा आणते, त्याला खरच तोड नाही. पावसाळा एन्जॉय करताना मजा करावी तर अशीच असेच होऊन जाते. 
पावसाळ्यात कणसाचे दाणेही खूप येतात. मग या दाण्यांचे सूप, कॉर्न कबाब, भजी असे कितीतरी पर्याय अनेकांच्या घरात रंगतात. हा पाऊस सारखासारखा पडत रहावा असेच वाटते. 
काही वेळा असंही होतं की, काही दिवस पाऊसच पडत नाही. आपण छत्रीविना बाहेर पडतो. आपलं काम संपत नाही तो पुन्हा आभाळ भरून तो धुवाधार बरसू लागतो. अशावेळी चौपाटीवर जाऊन त्याचा आनंद घ्यावासा वाटतो. लाटांच्या सानिध्यात धम्माल करावीशी वाटते आणि हो कणीस पण खावसं वाटतं. कारण तेच तर पावसाबरोबर तन आणि मन प्रसन्न करत असतं. 
दुपारच्या वेळी घरी असताना पाऊस असेल तर घरातही किती मजा आहे हे कळतं. वातावरण कुंद होतं. आपण आळसावतो. मग छान झोप घेऊन चहा प्यावासा वाटतो. तेवढ्यात खालून कणीसवाला ओरडतो. आपल्यालाही छत्री घेऊन ते खाली जाऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण यावेळी सोबतीला असते ती घरातली मंडळी. त्यांच्याबरोबर कणीस खात , मस्त गप्पा मारता मारता, पुन्हा चहा पिता पिता तो दिवसही मस्त रंगतो. पण आठवत राहतं कणीसच.
त्यामुळे पावसा तू बरस, त्या गारव्यात धुंद होताना कणीस खाण्याची मजा घ्यायची आहे सर्वांनाच. नाही का!

Web Title: Rainfall, Rainfall and Rainfall ...