शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे ते कन्याकुमारी मार पायडल!

By admin | Updated: December 18, 2015 15:38 IST

रवींद्र राठोड आणि सागर शिंदे. एक नगरचा, दुसरा ठाण्यातला. कॉमन वेड एकच, सायकलिंग. म्हणून दोघांनी ठरवलं, पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास करायचा! आणि साध्या सायकली घेऊन ते निघालेही!

पायी चालताना दम लागावा, असा घाटमाथ्याचा चढ तो सायकलने चढत होता. शेकडो किलोमीटरच्या प्रवासाने आधीच पायाला गोळे आलेले. वेग तर गोगलगाईचाच! हिय्या करत घाट चढलोच. ङिांग तर पुढे होती. सायकल उतरणीला लागली अन् सुसाट सुटलो. हवेला चिरत आणि आजूबाजूच्या वाहनांशी स्पर्धा करत घेतलेला थरारक अनुभव तर काय वर्णावा?
- भन्नाटच! खरं सांगू, जग जिंकणं म्हणजे काय असते, हे त्याच क्षणांनी शिकवले!!
रवींद्र राठोड आणि सागर शिंदे सांगतात, त्यांनी पूर्ण केलेल्या एका स्वपAाची कहाणी. उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणारे येडचॅप तरुण! होय येडचॅपच! अडगळीतील सायकली. त्यावर गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू ही राज्यं ओलांडत पुणो ते कन्याकुमारी असा 15क्क् किलोमीटरचा प्रवास. कधी अपघातांशी सामना, तर कधी ऊन-पावसाचा अडथळा! रस्त्यात कधी कद्रु माणसांची भेट, तर कधी दिलखुलास प्रेमही! स्वप्न पूर्ण करण्याच्या या वेडेपणाला काय म्हणावे? 
रवींद्र नगरचा. कधीकाळी कामाच्या निमित्ताने पुण्यात असताना पुणोकरांचे सायकलप्रेम अनुभवणारा! सागरही मूळचा नगर जिल्ह्यातील पाथर्डीचा, पण कामानिमित्ताने आता ठाण्यात स्थिरावलेला. आताचे हे जिवलग मित्र एकमेकांसाठी तसे अनोळखीच होते. पुण्याहून कन्याकुमारी सायकलने गाठावे, हा विचार प्रथम चमकला तो रवींद्रच्या डोक्यात. पण सोबतीला दोस्त असावा, म्हणजे एकसे भले दो! पण दुसरा कोण? हा प्रश्न रवींद्रला सागर्पयत घेऊन गेला. कधीतरी त्याने सागरचं सायकलप्रेम वर्तमानपत्रत वाचलं होतं. त्याला शोधणार कसं, हा प्रश्न सोडवला फेसबुकने! रवींद्रने सायकलवारीची कल्पना सागरकडे मांडली. गंमत बघा, सागरही झपाटलेलाच निघाला. इरादा पक्का झाला अन् दोघेही निघाले सायकलवर. स्वत:चं जग जिंकायला! 
5 नोव्हेंबर 2015! रवींद्र नगरहून, तर सागर ठाण्याहून सायकलने पुण्यात पोहचला. मनात ओसंडून वाहणारा उत्साह, खिशात जेमतेम रक्कम, साध्याच सायकली आणि वाट्टेल त्या संकटाला सामोरं जाण्याच्या तयारीसह कन्याकुमारीच्या दिशेने पहिलं पायडल मारलं. ध्येय एकच होतं, कन्याकुमारीचा सनसेट! पण हा प्रवास सोपा नाही, याची जाणीव पहिल्याच दिवसानं करून दिली. पोट:या सुजल्या होत्या, पण मन थांबायला तयार होईना! परतीचा विचार तर कधीच लॉक केला होता. 
त्यांनी वेगाचा पहिला थरार अनुभवला तो महाराष्ट्र ओलांडून गोवा गाठताना! याच वेगाने हत्तीचे बळ दिले होते. पण प्रवासातील खडतर अनुभव अद्याप बाकी होते. 
कर्नाटक गाठलं, तेव्हा प्रवासाने परीक्षा घेतली. रवींद्र सागरच्या 6क् किलोमीटर पुढे निघून गेला होता. उडपीजवळ रवींद्रचा अपघाताशी सामना झाला. काही वेळ तो गांगरलाच. घरापासून शेकडो मैल दूर या अनोळखी प्रदेशात एकवेळ धीर सुटतो की काय, असा विचार मनाला शिवून गेला. पण ‘माणसं’ भेटली आणि रवींद्र सावरला. त्यांनी शेजारीच मंदिरात आश्रय दिला. शुश्रूषा केली. तेव्हा लक्षात आलं की, प्रदेश भलेही अनोळखी असेल, माणसं मात्र ओळखीची झाली.
तोर्पयतच्या प्रवासात कुठंही पावसानं गाठलं नव्हतं, पण कन्याकुमारीच्या आसपास गाठलंच. पण आता थांबायचं नाही हे मनाशी ठरवत, पाऊसधारा चिरत त्यांनी प्रवास सुरूच ठेवला. अखेर स्वप्नातील दिवस ठरला, तो 18 नोव्हेंबर! दुपारी कन्याकुमारी गाठून विवेकानंद स्मारकासमोर उभं राहून समुद्राकडे ङोपावलेला लालबुंद सूर्याचा गोळा त्यांनी डोळ्यात साठवला. 
हे सारं रवींद्र आणि सागर उत्साहात सांगत असतात! आणि म्हणतात, प्रवासात वाईट अनुभव आले पण ते आम्ही विसरलो. चांगलं ते लक्षात ठेवून सायकलवरच्या प्रवासाचा आनंद फक्त मनात भरून घेतलाय. परतीच्या प्रवासात पुण्याहून सागर ठाण्याकडे आणि रवींद्र नगरच्या दिशेने निघाला. तो सांगतो, पहाटे पाचच्या सुमारास शिक्रापूरजवळ सायकलचं टायर फुटलं. नवा टाकला तेव्हा 9 वाजले होते. पुन्हा रांजणगावजवळ सायकलची चेन तुटली. घराजवळ होतो, म्हणून बिनधास्त होतो. पण मदतीला कोणीही नव्हतं. चार किलोमीटर सायकल ढकलून आणली. नवी चेन टाकली, तेव्हा खिसा शब्दश: रिकामा झाला होता. तरीही सायकल चालण्याच्या स्थितीत नव्हती. बसने नगर गाठावेसे वाटले, पण बस वाहक नाही म्हणाला.  शेवटी मजल-दरमजल करत दुपारी 3 वाजता नगर गाठलं.
आता या सा:याला कोणी वेडेपणा म्हणो किंवा आणखी काही, पण मनात होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पायडल मारलं! आमच्यासाठी हे जग जिंकण्यासारखंच होतं!’
रवींद्र अन् सागर ही त्यांची गोष्ट सांगतात, तेव्हा त्यांचा हा आनंददायी वेडेपणा आपल्यालाही मान्यच करावा लागतो.
 
- साहेबराव नरसाळे 
(लेखक लोकमत नगर आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)