लॉकडाउनने तर जगभरात तरुणांना घरात बसवलं आहे, त्यातले काहीजण मात्र वेळ सत्कारणी लावत, स्वत:ला ‘सुकून’ हवा म्हणून अनेक कल्पक, कलात्मक गोष्टी करत आहेत. ...
आता हे लॉकडाउन संपलं की, असा व्यायाम करतो, जीम लावतो, मॅराथॉन पळतो, असं काही तुमच्या मनात असेल तर तातडीनं काढून टाका आणि आजच्या आज घरच्या घरी कसा व्यायाम करता येईल याचा विचार करा. त्यासाठी या काही आयडिया. ...
कॅम्प्स मुलाखतीत निवड झाली; पण प्रत्यक्ष नोकरीवर कधी रुजू होता येईल? - सांगता येत नाही. ज्यांची अंतिम परीक्षा व्हायची, ते उत्तीर्ण होतील, निकाल लागेल मग त्यांना कधी ‘जॉब’ मिळेल? - याची तर काहीच खात्री नाही. ...
सध्या यू-टय़ूबर्स आणि टिकटॉकर्स यांच्यात जोरदार व्हर्चुअल वॉर सुरू आहे. कोण सर्वश्रेष्ठ हे दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या यूजर्समध्येही भांडणं लागली आहेत. दुसरीकडे फेसबुकवर कुठल्याही पोस्टने भावना दुखावून घेत भयानक भांडणं करणारे ...
चला झूम मिटिंग करू, गप्पा मारू, ऑनलाइन गेटटुगेदर करू ही अनेकांना गंमत वाटते आहे; पण झूम वापरणं वाटतं तितकं सुरक्षित नाही. ते वापरताना खबरदारी घ्या. ...
आता करायला काही दुसरं नाहीच्चे, हातात मोबाइल आणि त्यावर नेट पॅक नसता तर वेड लागलं असतं असं अनेक तरुण सांगतात. सतत ऑनलाइन राहून डोकं बधिर व्हायला लागलं, अशी तक्रारही करतात; पण मग यावर उपाय काय? ...
सरकारात साहेब होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठय़ा जिल्ह्याच्या ठिकाणी क्लासेस लावून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो जण आपापल्या गावाकडे परतले आहेत. त्यांच्या मनावरचं मळभ कसं दूर करता येईल? ...
मुंबईहून निघालेले तरुण नाशकात भेटले. थेट उत्तर प्रदेश, बिहारमधल्या आपल्या गावी निघाले होते. बहुसंख्य चालत, काहीजण सायकलवर, क्वचित कुणाकडे दुचाकी. सगळे तरुण. वय वर्षे 20 ते फार तर 35-40. कुणासोबत बायका-मुलं. कुणीकुणी जोडपी. मुंबईत हाताला काम उरलं नाही ...
तेलंगणा-आंध्र प्रदेशात रोजंदारीसाठी, मिरच्या खुडण्यासाठी गेलेले मजूर आता गडचिरोली-चंद्रपूरमध्ये परतत आहेत, काही पुढे झारखंडला जात आहेत. उन्हात मैलोन् मैल चालत आहेत, ना पोटात अन्न, ना पायात ताकद. मात्र त्यांचाही ध्यास एकच, ‘घर जाना है!’ ...
काम तसं नेहमीपेक्षा जास्त नाही; पण फटिग येतो? पुस्तक हातात घेतलं तर वाचवत नाही, बातम्या लावल्या तर काय ऐकलं हे आठवत नाही, सिनेमे पाहतानाही मन लागत नाही त्यात. हे सगळं का होतं आहे? ...