डोकं जड झालंय, उदास वाटतं, एकदम चिडचिड होते, तुमचा स्क्रीन टाइम मोजा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:17 PM2020-05-14T12:17:58+5:302020-05-14T12:22:42+5:30

आता करायला काही दुसरं नाहीच्चे, हातात मोबाइल आणि त्यावर नेट पॅक नसता तर वेड लागलं असतं असं अनेक तरुण सांगतात. सतत ऑनलाइन राहून डोकं बधिर व्हायला लागलं, अशी तक्रारही करतात; पण मग यावर उपाय काय?

feels sad, very irritable, count your screen time! | डोकं जड झालंय, उदास वाटतं, एकदम चिडचिड होते, तुमचा स्क्रीन टाइम मोजा !

डोकं जड झालंय, उदास वाटतं, एकदम चिडचिड होते, तुमचा स्क्रीन टाइम मोजा !

Next
ठळक मुद्देआपला स्क्रीन टाइम रोज थोडाथोडा कमी करत जाणं आणि प्रत्यक्ष संवाद वाढवणं याला पर्याय नाही !

- मुक्ता पुणतांबेकर
(पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक असून, तिथं त्या डिजिटल व्यसन मुक्ती केंद्रही चालवतात.)

1) तरुणांचं म्हणणं असतं, की मोबाइल, सोशल मीडिया नाही वापरला तर बोअर होतं. काय करावं?

तरुणांना अशा काळात कंटाळा येणं मी अगदीच समजू शकते. मात्न तो घालवण्याचे खूप उपाय आजच्या काळात उपलब्ध आहेत. तरुणांनी वेगवेगळे छंद जोपासावेत. ऑनलाइनच नाही तर ऑफलाइनही असे छंद जोपासता येतात. ऑनलाइन कसा आणि किती वेळ तरुणांनी घालवायचा यात त्यांच्या आई-वडिलांची भूमिकाही खूप महत्त्वाची ठरते. अनेकदा आमच्याकडे मुलांच्या तक्र ारी घेऊन येणारे पालक सांगतात की, त्यांना मुलांना मोबाइल वापराबाबत शिस्त लावायचीय. मात्न त्या मुलांशी बोलल्यावर त्यांचं म्हणणं असतं, की मुळात पालकच स्वत: जास्त मोबाइलवर असतात. तर, मुलांना काही सांगण्याआधी पालकांनी एक चांगलं रोल मॉडेल झालं पाहिजे. स्वत:ला सतत तपासू शकतो. सध्या बहुतेक पालक  वर्क फ्रॉम होम  करतात. अशा वेळी ब्रेक घेऊन मुलांसोबत एखादा बैठा खेळ खेळणं, त्यांना घेऊन व्यायाम करणं अशा अॅक्टिव्हिटी पालकांना करता येतील. बाकी तरुण मुलांनी आपल्या स्क्रीनटाइमबाबत स्वत:ही सतर्क व्हावं !

2) अनेक तरुण दोस्त सांगतात की, रात्नी जाग येते मधूनच, तेव्हाही वाटतं आता मोबाइल पहावा, नाहीच राहवत, मग झोपमोड होते आणि रात्री-बेरात्रीही मोबाइल पाहिला जातो.

असं होतं खरं. यावर प्रयत्नपूर्वक नियंत्नण मिळवता येईल. आमच्याकडे येणा:या तरुण रुग्णांना समुपदेशनादरम्यान हेच सांगतो, की संपूर्ण घराने एकत्न बसून साधे सोपे नियम ठरवावेत. सगळ्यांनीच ते पाळण्यासाठी एकमेकांना प्रेरित करावे. घरात वायफाय असेल, तर एका विशिष्ट वेळी ते बंद करावं. सगळ्यांनी आपापली गॅजेट्स बंद करावीत. सर्वाच्या सोईनुसार एक डिजिटल टाइमटेबल ठरवून घ्यावं. नियम पाळण्याची जबाबदारी सगळ्यांचीच. म्हणजे, रात्नी दहानंतर गॅजेट्स बंद करायची ठरली तर मुलांसह पालकांनीही ती बंद करावीत. नसता मुलांच्या दृष्टीने नियमांना काही अर्थ राहत नाही.

3) आता तर लॉकडाऊन सुरूआहे, मित्र भेटत नाही, माणसं दिसत नाहीत अशावेळी फोनवर कुणाशी तरी गप्पा मारल्यावर बरं वाटतं, नसता एकटं वाटतं, चिडचिड होते. याबद्दल काय करता येईल? त्याला नुसता सतत मोबाइलवर पडीक असतो असं लोक म्हणतात; पण मग पर्याय काय?

या काळात गप्पा, संवाद करणं गरजेचंच आहे. मात्न कुणाशी किती काळ आपण बोलतोय हे स्वत:शी तपासत राहण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतील. म्हणजे फोनवर बोलताना टायमर लावलं पाहिजे. दहा-पंधरा मिनिटांचा हा टायमर वाजला, की संवाद संपवावा. सध्या त्यांनी टायमर लावावं. हा लॉकडाऊन खरं तर पालकांशीही असलेलं नातं घट्ट करण्याची संधी आहे. परस्परांशीही बोलण्याचा प्रयत्न करा. काही गोष्टी एकत्र करा, त्यात वेळ जाईल आणि ऑफलाइन संवादाला निदान सुरुवात तरी होईल.


4) सतत स्क्र ीन पाहिला की फटीग येतो, डोकं दुखतं. असं का होतं? हे नॉर्मल आहे का?

स्क्र ीनचा उजेड डोळ्यांसह मेंदूसाठी घातक आहे. स्क्र ीन सतत प्रकाशमान असतो. आपले डोळे मुळात अशा सततच्या उजेडासाठी तयार झालेले नसतात. पुन्हा हेसुद्धा आहेच, की मोबाइलमधली रेडीएशन्स थेट मेंदूत जातात. सात वर्षार्पयतच्या लहान मुलांचा मेंदू तर यासाठी अजिबातच तयार नसतो. त्यांची कवटी पुरेशी विकसित नसल्याने रेडीएशन्स थेट मेंदूर्पयत जातात. तरुणांमध्येही सतत स्क्रीनवर असल्याने एकाग्रता कमी होणं, अस्वस्थता, चिडचिड अशा गोष्टी उद्भवतात. आपल्या मानसिकवाढीच्या दृष्टीने सतत स्क्रीनकडे बघत राहणो धोक्याचे आहे. चॅट करण्याचा डोळ्यांवर आणि इतरही दुष्परिणाम होतात. त्यामुळे डोकं जड होणं, फटीग येणं मोबाइलवर वापरातून असं होत असेल तर वेळीच सावध होऊन वापर कमी करणं हाच त्यावर उपाय आहे.

5) पण ते करायचं कसं? स्क्रीन एडिक्शन दूर करण्याचे काही ठळक उपाय काय असू शकतील?
महत्त्वाचा उपाय म्हणजे संतुलन. 
आता गॅजेट्स आणि सोशल मीडिया जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग झालाय. यापासून पूर्णत: अलिप्त राहणं तर शक्य नाही. पण आपणच सारासार विचार करून काही नियम ठरवून घ्यावेत. किती वेळ आणि कशासाठी हे तंत्नज्ञान वापरायचं हे प्रत्येकाने ठरवावं. वापरतानाही मधून-मधून डोळ्यांना, मेंदूला विश्रंती दिली पाहिजे. सतत फोनवर बोललं गेलं तर कानावर परिणाम होतो.
स्मार्टफोन हाच फक्त एक मनोरंजनाचा सोर्स नाही. पुस्तकं, संगीत, छंद जोपासणं अशा गोष्टी केल्या जाऊ शकतात. शरीराची काळजी घेणं, व्यायाम या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सतत स्मार्टफोन वापरला तर या गोष्टींसाठी वेळ काढता येत नाही. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. जेवताना गॅजेट्स हाताशी असतील तर आपण किती आणि काय खातोय यावर नियंत्नण ठेवता येत नाही. यूज आणि मिसयूज हे दोन शब्द लक्षात ठेवत सगळ्यांनी वैयक्तिक तारतम्य ठेवावं.
आता सगळ्याच मोबाइलमध्ये अॅप्स असतात, जी स्क्रीन टाइम मोजतात. डिजिटल वेलबीइंगसाठी मदत करतात. त्यांचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे. म्हणजे आपल्यालाच आपला वेळ कमी करत न्यायला मदत होते. ते ठरवून केलं पाहिजे.
ऑनलाइन राहण्याशिवाय करमतच नाही तर मग ठरवून एखादी नवीन भाषा शिका. कोर्स करा. पबजीसारख्या गेम्समध्ये मुलं वाहवत जातात ते टाळा. फारतर पालकांसह ऑनलाइन चेस किंवा मेमरी गेम्स खेळता येतील. त्याचा वापर करा, पर्याय शोधा सापडतात. स्क्रीनला पर्याय आहेच.

 

मुलाखत आणि शब्दांकन
- शर्मिष्ठा भोसले.

Web Title: feels sad, very irritable, count your screen time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.