रोबोट डॉग करतोय कोरोना रुग्णांची तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 01:57 PM2020-05-14T13:57:29+5:302020-05-14T14:01:44+5:30

डायनॅमिक्स लॅब नावाच्या अमेरिकेन कंपनीने ‘स्पॉट’ नावाच्या रोबोटिक डॉग बनवला आहे. हा रोबोट डॉग कोरोना रुग्णांचं तापमान घेतो, विशेष म्हणजे या कंपनीने या रोबोटचं फ्टवेअर/हार्डवेअर सर्वासाठी वापराला खुलं केलं आहे..

Spot the Robot Dogs -help corona patients | रोबोट डॉग करतोय कोरोना रुग्णांची तपासणी !

रोबोट डॉग करतोय कोरोना रुग्णांची तपासणी !

Next
ठळक मुद्देस्पॉट नावाचा रोबोट डॉग

-प्रसाद ताम्हनकर

सध्या जगभरातील आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या लढय़ात आपला जीव पणाला लावून लढत आहेत. 
प्रत्यक्षात कोरोना रुग्णांच्या संपर्कात  येत असल्याने, या आरोग्य कर्मचाऱ्याना म्हणजेच डॉक्टर असोत, नर्स, वॉर्डबॉय वा रु ग्णालयातील इतर कर्मचारी यांना असलेला संसर्गाचा धोका कसा कमी करता येईल याचाही सध्या जगभर विचार सुरूआहे.
जगभरातील शास्रज्ञ आणि तंत्नज्ञ विविध प्रयोगांवरती काम करत आहेत. 
अमेरिकेतील बोस्टन डायनॅमिक्स लॅबने आरोग्य कर्मचाऱ्याचे कार्य सुकर करणाऱ्या आणि त्यांचा रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क टाळण्यास मदत करणाऱ्या एका रोबोटिक डॉगची निर्मिती केली आहे.
 रोबोटिक निर्मितीच्या क्षेत्नात कार्यरत असलेल्या डायनॅमिक्स लॅबकडे मार्चच्या सुरुवातीपासूनच अनेक हॉस्पिटलकडून मदतीची मागणी होत होती. हॉस्पिटल कर्मचारी व आरोग्यसेवक यांचा रुग्णांशी येणारा प्रत्यक्ष संबंध टाळण्यासाठी या लॅबचे काही रोबोट उपयोगी ठरू शकतील का या संदर्भात विचारणा होत होतीच.
 डायनॅमिक्स लॅबनेदेखील तत्परतेने ‘स्पॉट’ नावाच्या रोबोटिक डॉगची निर्मिती करून दिली.
हार्वर्ड विद्यापीठाच्या ब्रिघ्ॉम आणि  महिला रुग्णालयात दोन आठवडय़ांपूर्वी स्पॉट तैनात करण्यात आला आहे. 
आता, हा बॉट टेलिमेडिसीनसाठी साहाय्य करणं, ट्राएज टेंट आणि पार्किग लॉट्ससारख्या ठिकाणी आरोग्य कर्मचा:यांना मदत करणं अशी काम करत आहे. सामान्यत: प्रोटोकॉलनुसार संशयित रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यावरती त्याच्या शरीराचं तापमान वाचनासाठी रुग्णांना बाहेरील तंबूत उभं राहणं आवश्यक असतं. या चाचणीसाठी सुमारे पाच वैद्यकीय कर्मचारी लागू शकतात, ज्यांना अशावेळी या कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. मात्न आता स्पॉट रोबोट डॉगचा वापर करून रु ग्णाच्या शरीराचे तापमान मोजणो सहजशक्य झालं आहे. त्यामुळे आता हे रुग्णालय या वातावरणात कर्मचा:यांची संख्या कमी करू शकले आहे. काही प्रमाणात फेस शिल्ड आणि एन-95 मास्क यासारख्या वैयक्तिक संरक्षक उपकरणांच्या मर्यादित साठय़ाच्या अडचणीशीदेखील लढू शकते आहे. या रोबोट डॉग स्पॉटच्या मागच्या बाजूला एक आयपॅड आणि टू वे रेडिओसह सुसज्ज करण्यात आले आहे. 
आरोग्य सेवा कर्मचारी तंबूत असलेल्या रुग्णांच्या ओळींमधून त्याला अगदी लांब बसून सहजपणो हिंडवू शकतात. त्याचवेळी रुग्णांसह व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदेखील करू शकतात. आतार्पयत, रुग्णालयाकडून आलेले अभिप्राय दर्शवतात की स्पॉटने आरोग्य कर्मचा:यांना संक्रमक रुग्णांच्या संपर्कात येण्याच्या शक्यतेपासून दूर ठेवण्यास आणि ही शक्यता कमी करण्यास खूपच मदत केली आहे. टेली-ऑपरेटिव्ह असलेल्या या रोबोटने पूर्ण केलेल्या प्रत्येक एका शिफ्टमुळे कमीत कमी एक आरोग्यसेवा कर्मचारी या रोगाच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होते आहे, असे बोस्टन डायनॅमिक्सने नोंदवलं आहे. स्पॉटची एकूण कामगिरी बघता बोस्टन डायनॅमिक्सने या रोबोटिक डॉगचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर स्टॅक ओपन सोर्सिग वरती उपलब्ध केलं आहे. कंपनीच्या वेबपेजवरती ते मोफत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. बोस्टन डायनॅमिक्सला आता भविष्यात शरीराचे तापमान, श्वसन, नाडीचा वेग आणि ऑक्सिजन पातळी यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या करू शकणारा बहुपयोगी असा रोबोट तयार करून त्याची उपयुक्तता अधिक वाढवायची आहे. त्यानंतर कंपनीने यूव्ही-सी लाइट (किंवा तत्सम तंत्नज्ञान) याद्वारे व्हायरसचे कण नष्ट करण्यासाठी आणि रु ग्णालयांमधील पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठीदेखील या रोबोटचा वापर कसा करता येईल यासाठी योजना आखत आहे. खरे तर, बोस्टन डायनॅमिक्सची कल्पना आहे की चाके असलेले किंवा ट्रॅक केलेले रोबोट सध्याच्या रोबोट डॉग स्पॉटपेक्षा अधिक चांगले कार्य करू करतील. म्हणूनच कंपनी अशा अधिक उपयुक्त रोबोटला तयार करण्यासाठी कॅनडाच्या क्लीयरपॅथ रोबोटिक्स बरोबर काम करत आहे. स्पॉटचा अत्यंत फायदेशीर ठरणारा वापर बघता, लवकरच जगातील अनेक प्रमुख देशात अशा प्रकारचे रोबोट्स मदतीसाठी तैनात केले जाण्याची चिन्हे आहेत. काही देशांनी या संदर्भात काम देखील सुरू केलं आहे, तर काहींनी स्पॉट सारखीच काही रोबोटिक तंत्नज्ञान प्रत्यक्षात वापरातदेखील आणायला सुरुवात केली आहे. जपानमध्येही ‘पेपर’ नावाचा रोबोट आता क्वॉरण्टाइन रुग्णांच्या मदतीला उभा राहिला आहे.


भारतासारख्या देशात जिथे आरोग्य कर्मचाऱ्याचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे आणि संपूर्ण आरोग्य प्रणालीवरच कमालीचा भार आला आहे, आपल्याकडेही असं तंत्रज्ञान लवकर वापरात आलं तर चांगलंच होईल.


(लेखक विज्ञानविषयक लेखक/पत्रकार आहेत.)

 

Web Title: Spot the Robot Dogs -help corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.