मुलींना किती ताण असतात कुणाला कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:20 AM2020-01-02T06:20:00+5:302020-01-02T06:20:02+5:30

‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.

oxygen special 2020 - girls are under tremendous stress! | मुलींना किती ताण असतात कुणाला कळणार?

मुलींना किती ताण असतात कुणाला कळणार?

Next
ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

-श्वेता चंदनकर
 

1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
मला लिहायला आवडतं. काहीच दिवसांपूर्वी समजलं, की माझी कविता 93 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी निवडली गेली आहे. फार भारी वाटलं.  ‘कविताबिविता करून उगाच टाइमपास करतेस’ असं म्हणणार्‍या लोकांची तोंडं बंद झाली, हेही भारीच झालं! मस्त वाटतंय. 

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

सर्वात जास्त स्ट्रेस नोकरीचा आहे. कधी एकदाची नोकरी लागते आणि विषय संपतो अस झालंय. मनपण सारखं भरकटत असतं. आपण ते केलं असतं बरं झालं असतं असं वाटतं. त्यासाठी चाललेली धावपळ, अभ्यास, मेहनत कधी सफल होईल, हे कळत नाही. अभ्यासावर असलेला फोकस हलतो, काय होईल या ताणाने डोकं फुटायची वेळ येते.    ‘कॉलेज संपलयं आता पुढे काय?’- या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळत नाही. त्यात सुंदर दिसण्याचा, वजन आटोक्यात ठेवण्याचा ताण असतोच मुलींसाठी! अमकीला नोकरी लागली, तमकीचं लग्न ठरलं यावरून टोमणे खावे लागतात. यातच परत भर म्हणून घरची कामं आली पाहिजेत, स्वयंपाक उत्तम जमला पाहिजे याचा ताण!  ‘तू जरा क्रीमबिम लावत जा गं, मुलांना गोर्‍यापान मुलीच आवडतात’ असल्या सल्ल्यांनी इतकं लो फील होतं. न्यूनंगड निर्माण व्हायला लागतो.
मुलींच्या आयुष्यात किती प्रकारचे ताण असतात, हे अन्य कुणाला कळणं फार कठीण आहे.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
मला मोजक्याच मैत्रिणी आहेत, आणि आम्ही सगळ्या फार घट्ट आहोत. आता बाकीच्या मार्गाला लागल्या, त्यामुळे भेटी फार होत नाहीत; पण आमची मैत्री आयुष्यभर राहील.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? 
आमचीच जनरेशन गंडलेली आहे, आम्हालाच आमच्या आई-वडिलांशी कनेक्ट करता येत नाही.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

माझ्या मते, अत्यंत कॉम्पिलीकेटेड लव्ह-लाइफ हा एक मोठा स्ट्रेस होऊन बसला आहे. कारण करिअर घडवायच्या वयात आम्ही नको त्यावेळी भलत्याच गोष्टीला प्रायोरिटी देतो; त्यामुळे जमलेलं गणित बिघडतं आणि कोडी निर्माण होतात.
आपल्या आयुष्याचा लव्ह हा एक भाग आहे हे आपल्याला माहिती असून, आपण अख्ख्या आयुष्यालाच लव्हचा भाग बनविण्यात व्यस्त असतो, इथेच चुकतो आपण.

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
आधी नोकरी करायचं ठरवलयं त्यानंतर लग्न.
लग्नानंतर वर्किग वुमन म्हणून जगायचयं. पण लग्नाआधी किंवा नंतर स्वतर्‍चं एकतरी पुस्तक प्रकाशित करायचंच, हे माझं ठरलंय.


 

Web Title: oxygen special 2020 - girls are under tremendous stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.