शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

'वयंम् ' चं एक खास शिबिर कायदा शिका

By admin | Updated: February 19, 2015 20:59 IST

दिव्याची गाडी तुमच्या दारात येतेच कशी’ हा लेख प्रसिद्ध झाला. तुम्हा सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

मिलिंद थत्ते, संघटक, वयम् चळवळ -
 
मित्रहो, रामराम!  ३0 जानेवारीच्या ऑक्सिजनमध्ये आमच्या ‘वयम्’ चळवळीविषयी ‘लाल दिव्याची गाडी तुमच्या दारात येतेच कशी’ हा लेख प्रसिद्ध झाला. तुम्हा सगळ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. दिवसरात्र फोन येत राहीले, ई-मेल आले आणि आता पत्रंही पोहोचू लागली आहेत. आमच्या तरुण गँगचे कौतुक तर सर्वांनी केलेच; पण बर्‍याच मित्र-मैत्रिणींनी आम्हाला ‘वयम्’ चळवळीत सहभागी व्हायचे आहे, कायदा शिकायचा आहे, आमच्या गावातला अन्याय दूर करायचा आहे, असंही कळकळीने सांगितले. काही जणांनी तर असंही सांगितलं की, आम्हीही असे प्रयत्न केले आहेत; पण यश आले नाही आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की, आता पुढे कसे जायचे ते सांगा. 
कायदा शिकण्यासाठी, आपल्या गावात अशी लोकशाही चळवळ चालवण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण आणि चार्जिंग गरजेचे आहे. असे दोन दिवसांचे निवासी शिबिर आम्ही  २८ आणि २९ मार्चला नाशिक येथे आयोजित करण्याचं ठरवलं आहे. या शिबिरात माहिती अधिकार कायदा, ग्रामपंचायत कायदा, ग्रामसभेबद्दलचे नियम आणि रेशन/ अन्न सुरक्षा कायदा हे विषय असणार आहेत. यासोबत ‘वयम्’च्या अनुभवी कार्यकर्त्यांची संघबांधणी आणि नेतृत्त्व या विषयातली सत्रंही असणार आहेत.  शिबिरासाठी नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. 
शिबिरात सहभागी व्हायचंय?
vayamindia@gmail.com 
या पत्त्यावर तुमची ई-मेल पाठवा. ई-मेलमध्ये तुमचं नाव, वय, पत्ता, शिक्षण कळवावं. शिबिरात सहभागी होण्यासाठी शिक्षणाची कोणीतीही अट नाही.
*  7709353104  या नंबरवर एसएमएस पाठवूनही नाव नोंदवता येईल. 
* या शिबिरात फक्त १७ ते ३0 वयोगटातील तरुणांना सहभागी होता येईल.
शिबिराची वर्गणी १00 रुपये आहे. 
* नोंदणी करणार्‍यांमधून शिबिरार्थींची निवड केली जाईल.
 
 
----------------------------
 
लिहा.मनापासून!
 
ठेचा-टेंगळं-मस्ती-मॅजिक.
यापेक्षा वेगळं काय असतं लाइफ!
पण, त्यातही अनेक गोष्टी छळतात, रुततात, टोचतात आणि काचतातही.
कधी वाटतं घ्यावं बंडाचं निशाण हातात, तर कधी वाटतं, भिरकावून द्यावेत सारे नियम आणि बेड्या,
करावं काहीतरी खास.
असं ‘खास’ तुमचं,
तुम्हाला छळणारं,
डाचणारं, काचणारं
किंवा जगवणारं, फुलवणारं
जे जे म्हणून येतं तुमच्या मनात.
ते ते सारं लिहा.
तुमच्या जगण्याविषयी,
प्रश्नांविषयी,
आणि माणसांविषयीही.
त्यासाठीच ही जागा.
तिचं नाव, 
टीटीएमएम.
 
पत्ता?- oxygen@lokmat.com