शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

२६ जुलैे

By admin | Updated: August 1, 2014 11:33 IST

पाऊस म्हटलं की, मला २६ जुलै आठवतोच. २६ जुलैपूर्वी मलाही पाऊस गोड, छान व प्रेमळ वाटत होता, पण त्यानंतर त्याची आठवणही भयभीत करणारी वाटते.

 

 
पाऊस म्हटलं की, मला २६ जुलै आठवतोच. २६ जुलैपूर्वी मलाही पाऊस गोड, छान व प्रेमळ वाटत होता, पण त्यानंतर त्याची आठवणही भयभीत करणारी वाटते. मी कुर्ला (प.) भागातील तक्यावार्डमध्ये लोकमान्य सेवा मंडळात राहत होतो. आमच्या जवळूनच मिठी नदी (खाडी म्हटलं तरी चालेल) वाहते. २६ जुलैपासूनच सर्वांना ही मिठी नदी       माहीत झाली.
२५ जुलैला पावसाला सुरुवात झाली, तो नेहमीसारखा पडत होता. हळूहळू पावसाचा जोर वाढतच होता. अन्सायंकाळी बघता बघता पाणी मिठी नदी भरून वाहू लागलं. रात्री पाणी आमच्या घराघरात शिरण्यास सुरुवात झाली. आम्हा सगळ्य़ांची धावपळ सुरू झाली. आम्ही मुलं एकमेकांच्या घरात जाऊन सामान हलवू लागलो, पण पाणी एवढय़ा जलद गतीनं वाढत होतं की, आम्हाला मदत करणंही अशक्य होऊ लागलं. पाण्याची पातळी वाढतच होती. अन् नेमकी त्यात वीज गेली. सगळीकडे अंधारच अंधार ! आमची चाळ असल्यानं सगळीकडे दाटीवाटी होती. मोकळं पटांगण असं नव्हतंच. शाळा, कॉलेज, नोकरीवरून येणारी मुलं-मुली, नोकरदार माणसं अक्षरश: पोहत पोहत येत होती. आम्ही घराबाहेर थांबून प्रत्येकाला हात देण्याचं काम करीत होतो. घरातील सामान व माणसं सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम करीत होतो. सगळीकडे अंधार, चोहोबाजूला पाणी असं चित्र तयार होत होतं. पाणी वाढतच होतं. पाऊसही थांबायला तयार नव्हता. आम्ही दुपारपासून भिजत होतो. आमच्या पायाखाली कधी कधी उंदीर, घूस घुटमळून जात होते, तर कधी चावा घेत निघून जात होते. 
सर्वत्र घाणीघाण होती. शौचालयं, गटारी, कचराकुंड्या हे सर्वत्र पाण्यामुळे एकच झालेलं होतं. त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी. रात्री तर पाणी आणखी जोर धरू लागलं. घरातील पोटमाळ्य़ाला पाणी टेकत होतं. माणसं भीतीनं पोटमाळ्य़ावर बसले होते. आम्ही मिनिटागणिक पाण्याची पातळी बघून देवाचा धावा करीत होतो. पोटमाळ्याला लागलेलं पाणी छताला लागायला लागलं. मध्यरात्र उलटून गेली, तरीही पाणी काही कमी होईना. नदीकडील माणसं स्वत:ची बायका पोरं घेऊन घराच्या छपरावर बसलेले दिसत होती. अन् पाणी छपराला टेकेल अशी स्थिती. आमच्या समोरून फ्रीज, टीव्ही, मोटारसायकल, घरातील कपाट इ. वस्तू अक्षरश: वाहून जात होत्या. 
 वस्तूच कशाला एक मृतदेह वाहत आला. आम्ही तो तसाच पुढे जाऊ दिला, आम्ही तरी दुसरं काय करणार? आपला जीव वाचला हेच फार होतं. पहाटे ४ वाजल्यापासून पाणी ओसरू लागलं. जो तो आपापली माणसं शोधू लागला. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं होतं. मला तर आजही पाऊस पडायला लागला की भीतीच वाटते. 
- हनुमंत रामचंद्र कोडलकर
मु. कोडलकरवाडी, 
 ता. माण, 
जि. सातारा