शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

फिदीफिदी हसत टाळ्यांवर टाळ्या

By admin | Updated: February 19, 2015 19:46 IST

एकदम चकाचक ऑफिस. आपल्या व्यवसायातली बडीबडी लोकं तिथं काम करतात. या ऑफिसात कधीतरी नोकरी मिळाली पाहिजे असं तुमचं स्वप्न

इंटर्न आहात आणि ऑफिसात तुम्ही असं वागता? 
तुम्ही एखाद्या ऑफिसात इंटर्न म्हणून जॉईन होता.
एकदम चकाचक ऑफिस. आपल्या व्यवसायातली बडीबडी लोकं तिथं काम करतात. या ऑफिसात कधीतरी नोकरी मिळाली पाहिजे असं तुमचं स्वप्न. आणि तिथंच तुम्हाला इटर्नशिप करण्याची संधी मिळते!
काम सुरू!
पण बहुतांश इंटर्न दोन प्रकारच्या चुका हमखास करतात.
काहीजण धास्तावून, जे काम दिलं तेच करत बसतात. तोंडच उघडत नाहीत. काम करुन झालं तर एक काम चारदा करतील पण तोंडाला कुलूप. ते कधी आले कधी गेले कुणाला कळत नाही. त्यांचं काम, आणि ते नोटीसही होत नाहीत.
दुसरे  इंटर्न दुसर्‍या प्रकारातले. हल्ली बहुतेक याच स्वभावाचे दिसतात.
एकदम शाईन मारू. सतत बडबड. आपल्याला फार कळतं असा आवेश. तिथं काम करणार्‍या सिनियर्सना आदेश देणं, सल्ले देणं पहिल्या दिवसापासून सुरू! अशा इंटर्नवर मग ‘आगाऊ’ शेरा बसतो आणि नोकरी मिळण्याची शक्यता असली तरी ती पुढे मिळत नाहीच.
असं का होतं तर इंटर्नशिप करताना ऑफिस एटिकेट्स नावाची गोष्टच अनेकांना माहिती नसते! आणि मग अत्यंत मॅनर्सलेसली वागून अनेकजण आपली शोभाच करून घेतात.
हे टाळायचं असेल तर, काही एटिकेट्स इंटर्नशिपपूर्वी घोटून पाठ करून ठेवाच.
१) इंटर्नशिपला वेळेवर जा, ऑफिसात पोहोचल्या पोहोचल्या तक्रार करू नका की, तुमचं ऑफिस किती लांब आहे. किती ट्राफिक होतं, मला इथं यायला किती त्रास झाला. हा तक्रारीचा पाढा एवढंच सांगतो की, तुम्ही इथं काम करायला अनुत्सुक आहात. आणि जरा कामचुकारही आहात.
२) एखादं काम तुम्हाला करायला आवडणार नसेल तरी करा, कारण हा प्रवासच शिकण्याचा असतो. पण अगदीच जमणार नसेल तर अत्यंत नम्रपणे सांगा की, मला करायला आवडलं असतं, पण येत नाही. कसं करू ते सांगा, किंवा सरळ सांगा की, मला दुसरं काम द्या हे नको. पण हे सांगतानाही आवाज हा माफीनाम्याचा असावा आदेशाचा नव्हे.
३) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कपडे. ते फॉर्मलच असावेत. तुम्ही कॉलेजात असलात तरी ते ऑफिस आहे. त्यामुळे फॉर्मल कपडे घालायला हवेत. विशेषत: मुलींनी हे लक्षात ठेवावं की, कॉलेज वेगळं, ऑफिस वेगळं.
४) ऑफिसातले सहकारी त्यांच्या कामाविषयी काही बोलत असतील तर मध्येच बोलू नका. कान देऊन ऐकू नका. तुमचा संबंध नसेल तर उगीच फिदीफिदी हसू नका.
५) आपले फोन सायलण्टवर ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण इथं काहीतरी शिकायला आलोय हे लक्षात ठेवून सगळ्यांशी म्हणजे अगदी ऑफिसातल्या शिपायापासून ते बॉसपर्यंत सगळ्यांशी नम्रतेनं वागा.