शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ये ना, रिमझिम बरसत.

By admin | Updated: August 1, 2014 11:41 IST

भिरभिरत्या नजरेनं तुझी वाट पाहणं. त्या वाटेकडे लागलेले डोळे अन् अधीर पाऊसवेडं मन ! तू येणार पुन्हा एकदा.

भिरभिरत्या नजरेनं तुझी वाट पाहणं. त्या वाटेकडे लागलेले डोळे अन् अधीर पाऊसवेडं मन ! 
तू येणार पुन्हा एकदा. 
या जाणिवेनंच मन मोहरून जातं, आठवणीनं फुलपाखरासारखं अलगद भिरभिरू लागतं. तशा तुझ्या-माझ्या आठवणी अगदी खूप-खूप आहेत. आठवायचं म्हटलं तर हिशोब जुळायचा नाही. 
खरंच सांग, तुलासुद्धा वाटते का रे एवढी ओढ मला भेटायची? या सृष्टीला रानावनाला, झाडावेलींना  नवपालवीला चिंबचिंब भिजविण्याची? 
तुझी वाट पाहणारा खट्याळ वारा हळूच कळीला विचारतो, चाहूल ही कुणाची? कळी लाजते अन् झाड हसतं. माझ्या मातीच्या अंगणालाही सुगंधात न्हाऊन निघायचं असतं.
आणि मला मात्र आठवायला लागतं तुझं रिमझिमणारं रूप. अंगणभर साचलेल्या पाण्यात सोडलेल्या कागदी होड्या. तुळशीपुढे ठेवलेल्या सांजदिव्याभोवती साचलेले टप्पोरे पाण्याचे मोती.  
ओलेती हवा. रिमझिमणारा पाऊस अन्  भिजल्या पाखरांनी पंखावर झेललेल्या पाऊसधारा. ओलं झालेलं त्यांचं घरटं. आणि पहाटे-पहाटे तुझं येणं.  भिजलेलं अंगण, झाडवेली अन् पक्षी तुझ्या येण्याचं गीत गातात. दुपारी तू लपंडाव खेळतो तर सांजवेळी निवांतपणे बरसतोस. रात्रभर धसमुसळा कोसळत जातो. कधीकधी तर आठाठ दिवस झडी लावतोस. 
खरंच प्रश्न पडतो मला तू थकत नाहीस का? 
खेड्यामधल्या कौलारू घरा-घरावरून कोसळत अंगणातून गावातल्या नदीकडे वाहतो. तुलाही ओढ त्या नदीच्या प्रवाहासह सागराकडे जाण्याची. 
सुसाट वारा, थयथयाट करणारी वीज आणि तुझा आवेश भीती वाटतेही कधीकधी. आणि वाटतं का, तू असं रूप बदलून बदलून भेटतोस.नवानवाच वाटतोस. आता तर कौलारू घरही हरवत चाललंय. शहरातल्या सिंमेटच्या जंगलात तू येतोस, खिडकीच्या चौकोनातून भेटतोस. आणि मग आठवत राहतात तुझी ही सारी रुपं. 
मग अचानक शब्द येतात कागदावर.
पुन्हा-पुन्हा रे तुझ्याचसाठी
गीत आठवते मृदू शिरव्याचे..
असाय ये मग माझ्या अंगणी
रिमझिम बरसत ये..
रिमझिम बरसत ये..
 
- प्रा. डॉ. प्रियदर्शिनी 
देशमुख