शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेस अच्छा होता है!

By admin | Updated: October 16, 2014 18:46 IST

आजकालच्या नोकर्‍या अतिशय ताणतणावाच्या असतात. ऑफिसमध्ये कितीही चांगलं वातावरण असलं तरी एक प्रकारची स्पर्धा कायम असते.

- विनोद बिडवाईक

आजकालच्या नोकर्‍या अतिशय ताणतणावाच्या असतात. ऑफिसमध्ये कितीही चांगलं वातावरण असलं तरी एक प्रकारची स्पर्धा कायम असते. कॅन्टीनमध्ये जेवण्याच्या टेबलवर भलेही सगळे सहकारी मनापासून गप्पा मारत असतील; पण कामाचा विषय आला की ती अघळपघळ मैत्री मागे पडते आणि स्पर्धा सुरू होते.आणि जेथे स्पर्धा असते, तेथे तणाव निर्माण होतोच. प्रत्येक बॉसला स्वत:ची टार्गेट्स असतात. त्यालाही स्पर्धा असतेच. तुमचे सहकारीही त्या स्पर्धेत असतात. अशा वेळेस एक प्रकारचा अस्पष्ट, न दिसणारा तणाव ऑफिसमध्ये तयार होतो.तो तुमच्याही वाट्याला येतो, प्रश्न एवढाच तो तणाव तुम्ही कसा ‘मॅनेज’ करणार?हल्ली तर मुलाखतीच्या वेळेसच उमेदवाराची स्ट्रेस हॅण्डल करण्याची क्षमता किती आहे हे तपासलं जातं. प्रश्न एकदम साधा असतो, ‘तुमचा दिवस तुम्ही कसा प्लॅन करता, काय काय करता दिवसभर’, असा एक साधा प्रश्न. तो बरेचदा विचारला जातो, त्यामागे  कारण हेच. तो अनुभवी उमेदवारालाही विचारला जातो, ‘‘ऑफिसमध्ये गेल्यावर तुझा दिनक्रम कसा असतो, हे जरा सांगशील?’’ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता यावरून बर्‍याच गोष्टी कळतात. तुमचं वेळेचं व्यवस्थापन चांगलं असेल, तर तुम्ही कामाचं व्यवस्थापनही चांगलं करू शकता. त्यातून तुमची कामाची शिस्त आणि तुमची ताण घेण्यादेण्याची कुवत समजते. अनेकांना आपल्या कामाची प्रायॉरिटी काय आहे हेच बरेचदा समजत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी तातडीच्या होऊन जातात. आणि ह्या तातडीच्या गोष्टी कशाबशा पूर्ण करताना तणाव निर्माण होऊन तुमच्याकडून चुका होतातच.दुसरा तणाव हा नातेसंबंधातील गडबडीने येतो. बर्‍याचदा चुकीच्या माहितीमुळे अथवा गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होतो. काही वेळेस दोन व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामुळे तणाव निर्माण होतो.समजा तुमचा एक सहकारी अतिशय अँग्रेसिव्ह आहे आणि तुमचा स्वभाव साधासरळ आहे, तुम्ही तुमचे शब्द तावून सुलाखून वापरता आणि तुमचा सहकारी एकदम ‘बोल्ड’ आहे. तुम्ही दोघे एका ‘प्रोजेक्ट’वर काम करता. तुम्ही दोघेही सारखेच काम करता, पण तो बोलका असल्यामुळे नेहमी ‘व्हीजिबल’ असतो. अशावेळेस कधीतरी तुमच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हा न्यूनगंड तणावाचं कारण होऊ बसतो.हे सर्व तुम्ही कसं मॅनेज कराल? कामाचा तणाव, सहकार्‍यासोबत वागताना निर्माण होणारा तणाव, बॉसने झापल्यावर निर्माण होणारा तणाव, ऑफिसमधील वातावरणामुळे तयार होणार तणाव, असे बरेचसे तणाव तुमच्या कामावर आणि प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. हे सर्व कसं हॅण्डल करायचं याची उत्तरे वेगवेगळी आहेत. त्या त्या वेळच्या सिच्युएशननुसार तो तो ताण हाताळावा लागतो. अवघड असतंच, पण अशक्य नाही.अनेकदा तर आपल्या मनातल्या भीतीमुळे अथवा अकारण चिंतेमुळे जास्त तणाव निर्माण होतो. समजा मुलाखतीत विचारलंच तुम्हाला की, स्ट्रेस कसा हॅण्डल कराल तुम्ही?तर खुशाल सांगावं, ‘‘मी परिस्थितीचा विचार करेन, वाईटात वाईट काय होईल याचा अंदाज घेईन, जे होईल ते स्वीकारण्याची तयारी करेल, पण जे वाईट होऊ शकतं ते  टाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन !’’- हे एक ‘स्टॅण्डर्ड’ उत्तर तुम्हाला देता येईल. शेवटी अशा अवघड परिस्थितीतून बाहेर पडतच तर तुम्ही तुमचं ‘मेटल’ सिद्ध करत असता ना?कधी कधी ‘‘स्ट्रेस’’ भी अच्छा होता है!