शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गझाला : अमेरिकेतला एक नवा आश्वासक भारतीय आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:50 IST

अमेरिकेत सिनेटर म्हणून निवडून आलेल्या गझाला जेव्हा ट्रम्प प्रशासनात न्याय हक्कांचा आवाज बनतात.

ठळक मुद्देमेरिकेतील भारतवंशीय खासदारांची संख्या आता आठवर गेली आहे.   

-कलीम अजीम

तुलसी गबार्ड, कमला हॅरिस, प्रमिला जयपाल, निमरत रंधावा ऊर्फ निकी हेली यांच्यानंतर अजून एक भारतीय वंशीय महिला अमेरिकेत खासदार झाली आहे. गझाला हाशमी. वर्जीनिया राज्यात सध्याच्या रिपब्लिकन सिनेटर ग्लेन स्ट्रेटवेंट यांचा त्यांनी पराभव केला. सध्या अमेरिकन संसदेत एकूण नऊ भारतीय वंशाचे खासदार आहेत.नवनियुक्त सिनेटर गझाला हाशमी यांचा जन्म हैदराबादचा. त्या पाच वर्षाच्या असताना त्यांचे वडील जिया हाशमी अमेरिकेत स्थानिक झाले. जिया हाशमी व्यवसायाने डॉक्टर. गझाला यांनी जॉर्जिया साउर्थन विद्यापीठातून बी.ए. केलं. इमोजी युनिव्हर्सिटीतून साहित्यशास्नत पीएच.डी. केली. त्यांचे पती अझहर रफिक शिक्षणतज्ज्ञ आहेत. या दांपत्याला दोन मुली आहेत.गझाला वर्जीनिया राज्यातील रिचमंड शहरातल्या सारजेंट रेनॉल्डस कम्युनिटी कॉलेजमध्ये शिकवत होत्या. आता त्यांनी त्याचा राजीनामा दिला.गल्फ न्यूजच्या मते 5 नोव्हेंबर रोजी वर्जीनिया राज्यात झालेल्या निवडणुकीत त्यांनी अमेरिकेच्या बंदूक संस्कृतीविरोधात ठोस भूमिका घेतली. अमेरिकेत फोफावणारे बंदूक कल्चर सर्वाधिक धोकादायक मानले जाते.  त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा होता. त्यात सीबीएस न्यूजनेही या विजयाला अनोखा व ऐतिहासिक इतिहास म्हटलं आहे. इथे दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये गझाला म्हणतात, ‘‘मुस्लिमावर विविध प्रकारची बंदी घालणार्‍या ट्रम्प प्रशासनासाठी माझा विजय धक्कादायक असावा. मात्र अमेरिकेत राहणार्‍या अनेकांसाठी माझा विजय त्यांच्यासाठी आश्वासक आहे. भविष्यात हजारो स्थलांतरित लोकांसाठी माझा लढा असेल.’’गल्फ न्यूजच्या मते गझाला हाशमी ट्रम्पच्या निर्वासित धोरण कायद्याला बळी पडल्या होत्या. त्यांना अमेरिकेतून निघून जाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यावेळी गझाला हवालदिल झालेल्या होत्या. त्यामुळे ट्रम्प सरकारचे निर्वासित धोरण हादेखील गझाला हाशमी यांच्या निवडणूक प्रचाराचा एक महत्त्वाचा मुद्दा होता.गझाला या जनतेतून निवडून जाणार्‍या पहिल्या मुस्लीम महिला सिनेटर आहेत.गझाला हाशमी यांच्यासह या निवडणुकीत अजून तीन भारतवंशीय व्यक्तीचा या निवडणुकीत विजय झालेला आहे. सुहास सुब्रमण्यम त्यातलेच एक. मूळ बंगळुरूचे असलेले सुहास ओबामा सरकारमध्ये व्हाइट हाऊसच्या तंत्नज्ञान धोरणाचे सल्लागार होते. गझाला हाशमी आणि सुहास सुब्रमण्यम या सदस्यांसह अमेरिकेतील भारतवंशीय खासदारांची संख्या आता आठवर गेली आहे.