शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पावलात पॉवर

By admin | Updated: January 29, 2015 15:28 IST

हील्स म्हणजे पायात उंच टॉवर? नव्हे.

हायहील्स घालून टाक्टाक् चालत जायचं याची बहुतेक प्रत्येक मुलीला क्रेझ असते! ‘मला नाही आवडत हाय हील्स’ असं जी नाक मुरडून म्हणते तिच्याही मनात एकदा कधीतरी आपण पॉइण्टर हील्स घालून चालून पहावं असं खोल दडलेलं असतंच म्हणा!
चाल जास्त पडते म्हणून पाय किंवा पाठ दुखते म्हणून, हिल्स घालून पळता येत नाही म्हणून अनेकजणी हील्स वापरत नाहीत हे खरंय!
मात्र तरी ‘हील्स’ घालण्याची फॅशन कधीच जुनी होत नाही.
आणि आता तर काय, एका फ्रेंच अभ्यासानं हे सिद्धच केलंय की, हील्स घातले की मुलींच्या व्यक्तिमत्त्वाला अँडिशनल पॉवर मिळते.
हील्स? आणि पॉवर?
युनिव्हर्सिटी द ब्रिटाज-सूड या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार फॅशनचा हा नवीन संदर्भ समोर आला आहे. स्त्री-पुरुषांच्या लैंगिक वर्तनाचा अभ्यास करणार्‍या या विद्यापीठातल्या अभ्यासकांचं म्हणणंच आहे की; हील्स वापरणार्‍या मुलींकडे पाहण्याची पुरुषांची दृष्टी वेगळी असते, आणि त्या मुलींचा अँटिट्यूडही ठाम आणि स्पष्ट असतो. 
एकतर हील्स घालून मुली सुंदर दिसतात, आणि दुसरं म्हणजे त्या ‘अँप्रोचेबल’ नाहीत असा संदेशही देतात असं हा अभ्यास म्हणतो!
हाय हील्स ही फॅशन कधीच आउटडेटेड ठरणार नाहीत, असाही या अभ्यासाचा दावा आहे.
 
जगातले सगळ्यात ‘हॉट’ आणि स्टायलिश हील्स ज्यांना म्हणतात, स्पाईक्ड हील्स. जगभरातल्या रनवेज् आणि नाईटक्लबमध्ये सध्या हेच हील्स जास्त दिसतात.  १0 सेंण्टीमीटर म्हणजेच ४ इंच एवढी या हिल्सची उंची असते.
 
एक्स्ट्रिम हील्स ही खरी तर सध्याची सर्वाधिक क्रेझ असलेले हील्स आहेत. १३ सेण्टीमीटर ५ इंच इतकी त्याची उंची. अर्थात हे हील्स वापरणं धोकादायक असतं, पण ते आपण कधीतरी वापरू शकू असं स्वप्न पाहणार्‍या मुलींची संख्या युरोपात जास्त आहे.
 
हील्स नियमित वापरल्यानं पाठदुखी, पाय मुरगुळणं, घोट्याचं दुखणं हे आाजार होतातच, तरीही उंचच उंच हील्स वापरण्याची क्रेझ जगभरात वाढतेच आहे.