शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

डू यू शॉप ऑनलाइन?

By admin | Updated: July 24, 2014 19:33 IST

खरेदीला जाणं, हे आजही आपल्यासाठी एक सेलिब्रेशनच असतं.एकटं दुकटं कुणी खरेदीला जातं तरी का?

खरेदीला जाणं, हे आजही आपल्यासाठी एक सेलिब्रेशनच असतं.
एकटं दुकटं कुणी खरेदीला जातं तरी का?
मित्रमैत्रिणी, सगळा ग्रुप तरी बरोबर जातो नाहीतर कुणीतरी जिवाभावाची मित्रमैत्रीण तरी सोबत असतेच. पूर्वी चार दुकानं पाहत फिरत खरेदी व्हायची आता अख्खा मॉल दिवसभर पालथा घालत एक दोन कपड्यांची खरेदी होती.मग काहीतरी आरबट चरबट खाणं, पिणं, जमल्यास सिनेमा, गप्पा.
हे एवढं सारी झालं तर शॉपिंगची मज्जा येते.
घरबसल्या एकट्यानं एखादी वेबसाइट उघडायची, काय हवं नको ते शोधायचं आणि क्लिक करून टाकायचं, पैसे ऑनलाइन जमा करून टाकायचे, कार्डाचा नंबर काय तो द्यायचा, घरबसल्या वस्तू येतात, झालं शॉपिंग, यात काय मज्जा?
असं आपल्यापैकी अनेक जणांना वाटू शकतं.
पण वेगानं होणारे बदल पाहता आता इतर गोष्टींसारखाच शॉपिंगही आता एकदम पर्सनल खासगी एक्सपिरीयन्स बनेल की काय, अशी शंका येऊ लागली आहे.
आपली गरज, बजेट आणि आवडनिवड याप्रमाणे हवं ते मिळेल त्या वेळी निवडायचं. पैसे मोजायचे, आली वस्तू ट्राय करून पाहायची. घालून पहायची. जमलं सगळं तर ठीक, नाहीतर परत पाठवायची, एक्स्चेंज करून घ्यायची.
किती सोपं होतंय सारं.
पुन्हा फिलिंग तेच. शंभर
प्रॉडक्ट्स पहायची, त्यातून जे योग्य, किफायतशीर वाटेल ते निवडायचं.
जगभरातलं तारुण्य आज हा मार्ग निवडून शॉपिंग करतंय. भारतातली तरुण मुलं तरी कशी मागे राहतील.  इंडियन कन्झ्युमर बिहेव्हिअर असोसिएशनच्या ( ही संस्था ग्राहकांच्या गरजा, खरेदीशक्ती, वर्तन याचा अभ्यास करते.) अभ्यासानुसार भारतीय तरुण ग्राहकाची खरेदीची मानसिकताही झपाट्यानं बदलते आहे. जसजसा मोबाइल आणि इंटरनेटचा वापर वाढेल तसतसे खरेदीची परिमाणं बदलतील. मोठय़ाच नाही तर छोट्या शहरातले ग्राहक जास्त प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग करतील, असा या संस्थेचा अभ्यास म्हणतो. त्याचं कारण एकच, शहरात तरी बडे मॉल, बडे ब्रॅण्डस सहज उपलब्ध असतात. पण छोट्या शहरात, खेड्यात जे आजवर मिळत नव्हतं, ते आता ऑनलाइन सहज मिळतं. कोणी कुठूनही खरेदी करू शकतं. शहर-ग्रामीण सीमारेषा पुसट व्हायची ही बदलती खरेदी-विक्री पद्धतही उपयोगी पडेल असा जाणकारांचा अभ्यास आहे.
त्यामुळे आपल्या खिशातून जाणारा पैसा आपल्या बदलत्या सामाजिक स्थित्यंतराचा भाग आहे हेही समजून घ्यायला हवं.
 
- आक्सिजन टीम