शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या काळातला मार्क्‍स म्हणून तो का गाजतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:44 IST

कॅपिटल इन द ट्वेण्टी-फस्ट सेंचुरी हे पुस्तक जगभर गाजतंय. त्याचे लेखक थॉमस पिकेटींना भेटायला हवं !

ठळक मुद्देथॉमस पिकेटी याने याच विषयावर दिलेला ‘टेड टॉक’ ऐकण्यासारखा आहे

- प्रज्ञा शिदोरे

अर्थशास्रबद्दलचं पुस्तक कधी गाजतं का? म्हणजे एकदम पॉप्युलर होतं का? तसं विरळच हे सारं. पण होतं असं. अर्थशास्नचं एक पुस्तक जगात प्रचंड गाजण्याची कदाचित ही दुसरीच वेळ असेल.पहिल्यांदा गाजलं आणि ज्यानं जगाला श्रम, भांडवल याकडे बघण्याची वेगळी दृष्टी दिली ते पुस्तक कार्ल मार्क्‍सचं. मूळ जर्मन भाषेत कार्ल मार्क्‍सने लिहिलेलं ते पुस्तक म्हणजे ‘दास कॅपिटल’. आणि आता हे दुसरं, कॅपिटल इन द ट्वेण्टीफस्ट सेंच्युरी. कदाचित म्हणूनच द इकॉनॉमिस्टसारख्या नियतकालिकाने थॉमस पिकेटी या अर्थतज्ज्ञाला त्यानं लिहिलेल्या या ‘कॅपिटल इन द ट्वेण्टीफस्ट सेंचुरी’ या पुस्तकासाठी ‘नव्या काळातला मार्क्‍स’ म्हणून संबोधलं असावं. पिकेटी यांनी हे पुस्तक प्रथम फ्रेंच भाषेत 2013 साली लिहिलं. 2014 साली त्यांचं इंग्रजी भाषांतर प्रकाशित झालं. आश्चर्य म्हणजे मूळ फ्रेंच भाषेत पुस्तकाचा खप फारसा झाला नाही. पण इंग्रजी भाषेतलं हे पुस्तक लगेचच बेस्ट सेलर ठरलं. जगभरातल्या तज्ज्ञांमध्ये, अभ्यासकांमध्ये याविषयी खूप चर्चा झाली. या पुस्तकाचा मूळ विषय ‘जगातली विषमता’ हा आहे. पिकेटीचं हे पुस्तक त्याच्या आणि त्याच्याबरोबर असलेल्या काही तज्ज्ञांच्या 10  वर्षाच्या अभ्यासाचं फलित आहे. त्यानं या पुस्तकात जगातील विषमतेचा अभ्यास करताना, लोकांचं उत्पन्न आणि संपत्तीमधील वाढ याकडे विशेष लक्ष दिलं आहे. त्याच्याकडे 18 आणि 19व्या शतकातील आकडेवारी आहे जी असं सांगते की, औद्योगिक क्र ांतीनंतर काही मोजक्याच लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली. पण राष्ट्रीय उत्पन्न मात्न कमी होत राहिलं.या इतिहासाला साक्ष ठेवून पिकेटी भविष्यावरही भाष्य करतो. तो म्हणतो की, जर देशांनी आत्ताच आपापल्या अर्थव्यवस्थांकडे लक्ष दिलं नाही तर जगात विषमता पराकोटीला जाईल. त्याचे सामाजिक आणि राजकीय परिणाम भयावह असतील. म्हणूनच जगात आता खासगी संपत्तीवर कर लादण्याची गरज आहे, त्याशिवाय समानता कधीच साधली जाणार नाही.हे पुस्तक अजून मराठी भाषेमध्ये उपलब्ध नाही. पण  या पुस्तकात मांडलेली विधानं भारताच्या संदर्भात कशी लागू पडतात हे बघायला हवं. ते सारं समजून घ्यायला हवं. हे पुस्तक तसं समजायला थोडं अवघड आहे. मात्र निदान कॉमर्स आणि अर्थशास्नच्या विद्याथ्र्यानी आणि समाजशास्नत रस असलेल्यांनीही ते वाचून समजून घ्यायला हवं.वाचणं ज्यांना जड जातं, त्यांनी थॉमस पिकेटी याने याच विषयावर दिलेला ‘टेड टॉक’ ऐकण्यासारखा आहे. आपलं वर्तमान आणि भविष्य कुठल्या दिशेनं जातं आहे, हे समजून घेण्याची ही संधी आहे.