शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय घेता येतो का तुम्हाला?

By admin | Updated: March 26, 2015 20:38 IST

नोकरीत, कामाच्या ठिकाणी निर्णय घेणं हीसुद्धा एक कलाच आहे. एक महत्त्वाचं स्किल आहे. आता या स्किलला एक वेगळंच महत्त्व येतं आहे.

समिंदरा हर्डीकर-सावंत
 
उत्तम करिअर करायचं, तर धोनीइतकी  चांगली हवी तुमची निर्णयक्षमता!
---------
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण लहान मोठे निर्णय घेतच असतो. अनेकदा तर  आपल्या लक्षातही येत नाही की आपण निर्णय घेतलाय, त्याप्रमाणं कृतीही करतोय. तसं पाहता निर्णय घेणं, निवड करणं ही कला प्रत्येक व्यक्तीला सहज येत असते.
अगदी व्यक्तिगत आयुष्यातसुद्धा आपण कधीतरी चिडून म्हणतो की, तुमचं तुम्ही ठरवा मी काहीही सांगणार नाही, निर्णय देणार नाही. हे म्हणणंसुद्धा एकप्रकारचा निर्णयच असतो.
व्यक्तिगत संदर्भात हे सारं सहज होतं, नकळत घडतं. कधी आपण जोखमीचे निर्णय जवळच्या माणसांना विचारूनही घेतो.
पण नोकरीत, कामाच्या ठिकाणी मात्र निर्णय घेणं हीसुद्धा एक कलाच आहे. एक महत्त्वाचं स्किल आहे. आता या स्किलला एक वेगळंच महत्त्व येतं आहे. 
कारण नोकरीत काम करताना तुम्ही जेव्हा काही निर्णय घेता तेव्हा ते निर्णय फक्त स्वत:पुरते र्मयादित नसतात. माझं मी पाहून घेईन असं म्हणून चालत नाही.  तुम्ही घेत असलेल्या निर्णयांचा प्रभाव इतरांवरही पडत असतो. परिणाम इतरांशीही संबंधित असतात. आणि म्हणूनच तुम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेता की नाही, ते निर्णय घेण्याइतपत धाडस दाखवता की नाही हे वारंवार तपासलं जातं!
धोनी मॅचमध्ये योग्यवेळी योग्य निर्णय घेतो ही त्याची खासियत आहे, तेच त्याचं स्किलही आहे. 
ते स्किल आपल्याकडेही यावं आणि आपण आपल्या टीमचं धोनी व्हावं म्हणून काही प्रयत्न करता येतील. शिकताही येईल हे स्किल. 
त्यासाठी या काही साध्या सोप्या गोष्टी.
टेक इट ऑर लिव्ह इट!
 
१) निर्णय घ्यायला बिचकू नका. सारासार दृष्टिकोन ठेवा. व्यवहार ज्ञान वापरा. परिस्थितीचा पूर्ण आढावा घ्या. आणि मग योग्य वाटेल ते निर्णय घ्या. आपलं चुकेल हे डोक्यातून काढून टाका.
 
२) मला वाटलं म्हणून मी असं केलं, अशा म्हणण्याला व्यावसायिक जगात काही स्थान नसतं. निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहिती एकत्र करा. योग्य माहिती निवडली, तिचा अचूक विचार केला तर अचूक निर्णय घेतला जाण्याची शक्यता वाढते.
 
३) निर्णय कुठलाही घ्या, तो शंभर टक्के बरोबरच ठरेल असं काही. अनिश्‍चितता हा कुठल्याही निर्णयाचा अपरिहार्य भाग असतोच. धोका असतो, असुरक्षितता आणि जोखीमही असते.  तिथंच तर खरं कसब लागतं. त्यामुळे जोखीम पत्करायची तयार असणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा.
 
४) आपण म्हणतो पुरेशी माहिती जमवा पण अनेकदा निर्णय घेताना आपल्याकडे पुरेशी माहितीही नसते. अशावेळी शितावरून भाताची परीक्षा करत निर्णय घ्यावा लागतो.
 
५) कितीही महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्ही घेतला तरी वास्तवाशी त्याचं नात असणं महत्त्वाचं. ‘हवा में तीर’ असं करून चालत नाही. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की महत्त्वाकांक्षी निर्णय घेऊच नयेत; पण ते घेतानाही आपण पुरेसा प्रॅक्टिकल विचार केलेला असणं महत्त्वाचं!  
 
६) आपण हल्ली प्रत्येक गोष्टीत ऑप्शन काय याचा विचार करतो. तशा ऑप्शनचा विचार करा, नसतील तर निर्माण करा. मग प्रत्येक पर्याय पडताळून जो सर्वात उत्तम असेल, त्याची निवड करा.
 
७) कोणताही निर्णय पूर्णपणे भावनांच्या आहारी जाऊन घेऊ नका. निर्णय घेण्यामध्ये भावनांचा विचार करावा, परंतु भावना आणि वस्तुस्थिती यांचा तारतम्यानं विचार करणं गरजेचं!  इमोशनली आणि घाईघाईत घेतलेले निर्णय हमखास गोत्यात आणू शकतात. 
 
८) मुख्य म्हणजे आपण घेतलेल्या निर्णयाच्या परिणामांचा विचार करा. आपल्या निर्णयानं ऑफिसात कोणावर, कसा परिणाम होईल, काय रिअँक्शन येतील याचा आधीच विचार करून ठेवा. त्यामुळे काही गडबड झाली तरी पुढं काय करायचं याचा निर्णयही आपण घेतलेलाच असतो.
 
९) नव्या जगाता डिसिजन मेकिंग हे सगळ्यात महत्त्वाचं स्किल ठरतं आहे हे विसरू नका.
 
१0) चटचट निर्णय घेऊन पटपट कामाला लागणार्‍या आणि इतरांना कामाला लावणार्‍या माणसांची खरंतर आता चलती आहे.त्यात तुम्ही आहात का?