शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

दोस्ती....? और मम्मी-पपांसे? - हो सकती है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

सच्च्या, निरपेक्षा मैत्रीचा शोध यावर्षी जरा घेऊन तर पहा.

ठळक मुद्दे घरातच आपले सच्चे दोस्त असताना आपण मैत्रीच्या शोधात का फिरतो?

प्राची  पाठक 

कॉलेजगोइंग तरुणांना बर्‍याचदा आपले आई-वडील म्हणजे ‘बिते कल की बात’ असं वाटत असतं. त्यांच्याशी, आपल्या लहान-मोठय़ा भावा-बहिणीशी आपलं पटणारच नाही, असंही मनात उगाचंच गोंदवून ठेवलेलं असतं. त्यांच्याशी बोलायचा, संवाद साधायचा त्यामुळे आपण प्रय}च करत नाही. संवादाची ही गरज उगाचंच दुसरीकडे शोधत असतो आणि त्यानं बर्‍याचदा निराशही होत असतो. आपले आई-वडील, भाऊ-बहीण, आजूबाजूची माणसं आपल्याला समजून घेणार नाहीत, असं सारखं का वाटत असतं? आपण कधी प्रयत्न करतो का घरातल्या माणसांशी नीट बोलायचा? त्यांना आपलं सुखदुर्‍ख, आपलं मन कळणारच नाही, असा पक्का निष्कर्ष आपण कशाच्या जोरावर काढतो?

* काय करता येईल?

ज्यांच्याशी आपली मैत्री व्हावी, त्यांच्याशी ‘बोलता’ यावं म्हणून आपण धडपडतो, ते आपल्याला त्यांच्यात घेतसुद्धा नाहीत, त्यांच्यामध्ये आपल्याला एंट्री मिळेल मिळावी म्हणून आपण इतकी धडपड करतो, त्याच्या दोन टक्के जरी धडपड आपण आपल्या घरातल्या मंडळींना समजून घ्यायला केली तर? - बघा एकदा करून.  एक छान दिलासा आपल्या मनाला मिळू शकेल. आपली भावंडं आपले जिगरी दोस्त होऊ शकतात. एकाच घरात वाढल्यामुळे आपली पूर्ण परिस्थिती त्यांना वेगळी सांगायची गरज नसते. यांना काय आपलं मन कळणार, या अडथळ्यापलीकडे जाऊन आपल्या बहीण-भावांशी, आपल्या आईवडिलांशी, आजोबा- आजीशी, इतरही नातेवाइकांशी, शेजारपाजारच्या लोकांशी मैत्नी होऊ शकते का, ते एक्सप्लोर करून बघितलं पाहिजे.  आपले जिव्हाळ्याचे विषय त्यांच्याशी बोलले पाहिजे. आपण काही न बोलताच आपल्या मनातलं ते ओळखून घेतील, अशा भ्रमात राहायची काही गरज नसते. आपल्या घरातल्या लोकांशी हळूहळू संवाद वाढवत नेता येऊ शकतो.

* त्याने काय होईल?

1- घरातल्या लोकांशी आपलं संभाषण केवळ संवादापुरतं न राहता हळूहळू मैत्नीत रूपांतरित होईल.2- आपला सच्चा मित्न होण्यासाठी कोणाला तरी भलामोठा दिवा घेऊन शोधत बसायची गरज नसते. आपल्या आजूबाजूला, आपल्या घरातच सच्चे मित्न असू शकतात आणि त्यांची मैत्नी आपल्यासाठी अत्यंत सुरक्षित असू शकते, याची जाणीव आपल्याला होईल. 3- अडीअडचणीला लागणारा सपोर्ट घरच्या घरीच तात्काळ मिळू शकेल. 4 - मदत करायची वेळ आलीच तर ते तयार असतात.