शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

घरचे ‘नाही’ म्हणतात हा डायलॉग का मारला जातो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

आपणच घरच्यांना गृहित धरतो आणि ते नाहीच म्हणतील अशी पळवाट शोधत राहतो?

ठळक मुद्देघरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

प्राची  पाठक

घरचे नाही म्हणतात’, हा एक फारच कॉमन डायलॉग जिकडे तिकडे ऐकायला मिळतो. कुणी काहीही सुचवलं आणि त्यात खोडा घालायचा असेल की आपला स्टॅण्डर्ड डायलॉग ठरलेला - घरचे नाही म्हणतात ! कधी कधी ‘घरचे नाही म्हणतात’ हे उत्तर आपण परस्परच देऊन टाकतो. खरंतर आपण त्यांच्याशी बोलणं टाळायला लागतो. एकटं झुरत बसतो किंवा उगाचच जास्तीची बंडखोरी करायला जातो. म्हणजे दोन्हीकडून मनात कचकच आहेच. ती पुढे वाढतच जाते. 

* काय करता येईल? कधी कधी घरातल्या लोकांना आपल्या मनातल्या गोष्टींची काहीही जाण नसते. आपलं फील्ड, आपलं विश्व आणि त्यांचं फिल्ड, त्यांचं विश्व पूर्ण वेगळं असू शकतं. त्यामुळे, जे आपल्यासाठी उत्तम आहे, असा आपल्याला पक्का विश्वास वाटत असतो, त्याबद्दल त्यांना काही कल्पनाच नसते. त्यात त्यांना काही अर्थही वाटत नसतो. म्हणून केवळ वडीलकीच्या नात्याने, कधी घरातलं बजेट पाहून, कधी घरातल्या इतर समस्या पाहून ते आपल्याला सरळ ‘नाही’ म्हणतात.  पण आपण आपली बाजू त्यांना नीट समजावून सांगतो का? आपल्या डोक्यातले प्लॅन अमुक पद्धतीने राबवले तर त्याचा आपल्याला, आपल्या करिअरला फायदा होणार आहे याची कल्पना आपण त्यांना मनमोकळेपणाने देतो का?  घरातल्या लोकांशी आपण जितका चांगला संवाद ठेवू, तितक्या चांगल्या प्रकारे ते आपल्याला समजून घेऊ शकतात.  

त्याने काय होईल?1- आपल्या डोक्यातल्या कल्पना घरच्यांना नीट कळतील.2- कोणता मुद्दा घरच्या लोकांशी कसा बोलावा, याबद्दलची जाण विकसित होईल. 3- कधी कधी घरच्यांच्या नाही म्हणण्यामध्ये काही तथ्य असू शकतं आणि आपल्या प्लॅन्समध्ये काही निसरडय़ा जागा असू शकतात, याची कल्पना त्यांच्यामार्फत आपल्याला येऊ शकेल.4- आपल्या डोक्यातल्या आयडिया अधिक उत्तम प्रकारे राबवायला घरच्यांचीदेखील मदत होईल आणि आपल्याला त्याच विषयाचे विविध पैलू कळत जातील. त्यांचा आधारही मिळेल.