शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

झ्वेरेवने फेडररला नमविले

By admin | Updated: June 19, 2016 04:23 IST

जर्मनीचा १९ वर्षीय युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव याने तब्बल आठ वेळच्या विजेत्या व अव्वल मानांकित रॉजर फेडरर याला हाले ग्रासकोर्ट टुर्नामेंटच्या उपांत्य लढतीत पराभवाचा धक्का देण्याची

हाले : जर्मनीचा १९ वर्षीय युवा खेळाडू अलेक्झांडर झ्वेरेव याने तब्बल आठ वेळच्या विजेत्या व अव्वल मानांकित रॉजर फेडरर याला हाले ग्रासकोर्ट टुर्नामेंटच्या उपांत्य लढतीत पराभवाचा धक्का देण्याची किमया केली आहे. झ्वेरेव याने तब्बल २ तास ६ मिनिटे चाललेल्या या लढतीत फेडरर याच्यावर ७-६ (४), ५-७, ६-३ अशी मात केली. आॅस्ट्रियाचा डॉम्निक थियेम व फ्लोरियन मायेर यांच्यातील विजेत्याशी झ्वेरेव याची अंतिम फेरीत गाठ पडेल. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररला जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानी असलेल्या झ्वेरेव याने मात दिली. अशी धक्कादायक कामगिरी करणारा तो चौथा ‘टीन एजर’ ठरला आहे. आपल्या खेळीविषयी बोलताना झ्वेरेव म्हणाला, ‘‘माझा आजचा खेळ खूपच चांगला झाला. मोक्याच्या क्षणी मी अधिक चांगला खेळ करू शकलो. खरे तर फेडररला ग्रास कोर्टावर नमविणे अविश्वसनीय आहे.’’ यापूर्वी दुबई ओपनमध्ये बोर्ना कोरिक या टीन एजरने २०१५ मध्ये त्यावेळच्या तिसऱ्या मानांकित अ‍ॅण्डी मरे याला मात दिली होती, तर २०१४ मध्ये बासेल स्पर्धेत पुन्हा बोर्ना कोरिकने त्यावेळच्या तिसऱ्या मानांकित राफेल नदाल याला नमविले. विम्बल्डन स्पर्धेत (२०१४) निक किर्गियोस या टीन एजरने त्या वेळच्या अव्वल मानांकित नदालला पराभूत करण्याची कामगिरी केली होती. (वृत्तसंस्था)