यूनिस खानची नजर दहा हजार धावांवर

By Admin | Updated: April 20, 2017 20:56 IST2017-04-20T20:56:53+5:302017-04-20T20:56:53+5:30

पाकिस्तान संघाच्या वेस्ट इंडिज दौºयातील अखेरच्या कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्यास अनुभवी फलंदाज यूनिस खान सज्ज

Younis Khan looked at 10,000 runs | यूनिस खानची नजर दहा हजार धावांवर

यूनिस खानची नजर दहा हजार धावांवर

>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 20 - पाकिस्तान संघाच्या वेस्ट इंडिज दौ-यातील अखेरच्या कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्यास अनुभवी फलंदाज यूनिस खान सज्ज झाला आहे. हा टप्पा गाठणारा पाकचा पहिला खेळाडू बनण्यासाठी यूनिसला २३ धावांची गरज
आहे. लंकेविरुद्ध २००० मध्ये कसोटी पदार्पण करणा-या यूनिसने ५३ च्या सरासरीने धावा केल्या असून प्रत्येक देशाविरुद्ध शतक ठोकले. पाक संघासाठी प्रामाणिक असलेल्या या खेळाडूने संघाचे हित सर्वोपरी मानले. त्याचे नाव ‘भरवशाचा खान’ असे ठेवायला हवे, या शब्दात माजी सहकारी शोएब अख्तर याने यूनिसबद्दल गौरवोद्गार काढले.

Web Title: Younis Khan looked at 10,000 runs