शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ खाडी देशांकडे मागितली भरपाई
2
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
3
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
4
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
5
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
6
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
7
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
8
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
9
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
10
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
11
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
12
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
13
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
14
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
15
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
16
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
18
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
19
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
20
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईमध्ये होणार विश्वचषक फुटबॉल स्पर्धा

By admin | Updated: February 18, 2016 06:30 IST

जगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल आॅफ फुटबॉल असोशिएशन) २०१७ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरु ळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत

प्राची सोनवणे,  नवी मुंबईजगातील फुटबॉलप्रेमीसांठी पर्वणी असणार्या फिफा (फेडरेशन इंटरनॅशनल आॅफ फुटबॉल असोशिएशन) २०१७ला होणा-या वर्ल्डकपचे सामने नेरु ळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. फीफा चे संचालक जेवीयर सेप्पी यांनी बुधवारी डी.वाय पाटील स्टेडियमची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. फुटबॉल हा खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ मानला जातो. प्रत्येक चार वर्षांनी १७ वर्षांखालील खेळाडूंसाठी होणारी विश्वचषक स्पर्धा भरवण्याचा मान यंदा भारताला मिळाला आहे. २०१७ च्या फटबॉल विश्वचषक सामन्यांकरिता झालेली निवडीने नवी मुंबई शहराच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे.या स्पर्धेतील प्रमुख सामने नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. या स्टेडियमची ६५ हजार प्रेक्षक सामावून घेण्याची क्षमता आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दूरचित्रवाहिन्या या खेळांचे थेट प्रक्षेपण करणार आहेत. फिफा पथकाने विश्वचषकासाठी कोलकाता, नवी दिल्ली, कोच्ची, गुवाहाटी, नवी मुंबई आणि गोवा या सहा अस्थायी आयोजन स्थळांपैकी नवी मुंबईची निवड केली आहे. चांगल्या गुणवत्तेच्या मैदानांची आम्ही अपेक्षा करत असून नेरुळमधील डी.वाय पाटील क्रीडा संकुलाची निवड खरोखरच योग्य असून फीफा पथकाने सर्वेक्षण करून हा निर्णय घेतल्याचे वेर्स्टन इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सीईओ हेन्री मेनेझेस यांनी सांगितले. आॅक्टोबर २०१६ पर्यंत या मैदांनातील किरकोळ सुधारणा केल्या जाणार असून वर्षभर आधी हे मैदान खेळाकरिता सज्ज ठेवले जाणार आहे. फीफा पथकाचे जॉय भट्टाचार्य यांनीही यावेळी या मैदानाची पहाणी केली. नेरुळमधील क्रीडासंकुलाची निवड हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. सर्वच फुटबॉल जगाच या टुर्नामेंटकडे लक्ष असते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच नागरिकांनी सहकार्य करावे. इतर देशातील क्रीडा संकुलांपेक्षा भारतातील नवी मुंबई शहरातील हे डि.वाय पाटील क्रीडा संकुलाला सर्वोवत्कृष्ट क्रीडा संकुलाचे स्थान मिळाले आहे.- विजय पाटील, अध्यक्ष, डी. वाय. पाटील अ‍ॅकॅडमीचे