आॅस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्यास विंडीज सज्ज : होल्डर

By Admin | Updated: December 10, 2015 00:58 IST2015-12-10T00:58:59+5:302015-12-10T00:58:59+5:30

आॅस्ट्रेलिया तगडा संघ असला तरी माझा विंडीज संघ येथे कसोटी विजय नोंदविण्यासाठी आला असल्याने आम्ही कडवी झुंज देऊ, असा विश्वास वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Windies ready to give Australia a tough fight: Holder | आॅस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्यास विंडीज सज्ज : होल्डर

आॅस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्यास विंडीज सज्ज : होल्डर

होबार्ट : आॅस्ट्रेलिया तगडा संघ असला तरी माझा विंडीज संघ येथे कसोटी विजय नोंदविण्यासाठी आला असल्याने आम्ही कडवी झुंज देऊ, असा विश्वास वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाहुण्या संघाचा विजयाचा रेकॉर्ड १-१४ असा आहे. गुरुवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. यंदा आम्ही शंभर टक्के योगदान देत खेळू, असा विश्वास व्यक्त करीत २४ वर्षांचा होल्डर म्हणाला, ‘१९९५ मध्ये पोर्ट आॅफ स्पेन कसोटीत आम्ही आॅस्ट्रेलियाला नमविले होते. सराव सामन्यात आम्ही पराभूत झालो हे खरे, पण मालिकेत चांगली कामगिरी करण्यास कटिबद्ध आहोत. मागच्या दौऱ्यात आम्ही आॅस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतरही कडवी झुंज दिली होती. यंदा याच इराद्याने आलो आहोत. चांगला खेळ करीत येथे विजय नोंदवू, असा विश्वास वाटतो. येथील हिवाळ्यात खेळणे गोलंदाजांसाठी अवघड ठरेल. पण परिस्थितीशी ताळमेळ साधून विजय मिळविण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास वाटतो.’’
उभय संघात पहिली कसोटी उद्यापासून (दि. १०) खेळली जाईल. श्रीलंका आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या चार सामन्यांत पराभवाचा धक्का बसलेला विंडीज संघ १९९६-९७ पासून आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सामना जिंकू शकला नाही. यावर जेसन म्हणतो, ‘‘संघात वेगवान गोलंदाज असल्याने आम्हाला विजयाची संधी असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Windies ready to give Australia a tough fight: Holder