शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘विम्बल्डन दुहेरी जेतेपद स्पेशल’

By admin | Updated: December 4, 2015 01:23 IST

भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या. इंडो- स्विस जोडीचे हे यश डोळे दिपवणारे आहे

नागपूर : भारतीय स्टार सानिया मिर्झाच्या सोबतीने स्वित्झर्लंडची तज्ज्ञ खेळाडू मार्टिना हिंगीस हिने यंदाच्या सत्रात महिला दुहेरीत नऊ स्पर्धा जिंकल्या. इंडो- स्विस जोडीचे हे यश डोळे दिपवणारे आहे. बीजिंग, वुहान, ग्वांगझू, अमेरिकन ओपन, विम्बल्डन, चार्ल्सटन, मियामी तसेच इंडियन वेल्स असे पाठोपाठ जेतेपद पटकविण्यात ही जोडी यशस्वी ठरली. यापैकी स्पेशल जेतेपद कुठले असा सवाल करताच हिंगीसने उत्तर दिले अर्थात, विम्बल्डन महिला दुहेरीचे जेतेपद!!कारकीर्दीत हिंगीस अनेकदा जखमांमुळे त्रस्त झाली. तिचे कोर्टवर परतणे कठीण ठरेल, अशी चर्चा केली जात होती. याविषयी विचारताच ती म्हणाली,‘ कोर्टवर पुनरागमन करणे म्हणजे झिरोपासून सुरुवात करणे असते. अशास्थितीत नव्या ऊर्जेशिवाय भक्कम पाठिंबा हवा असतो. १९९६ साली मी १५ वर्षे ९ महिन्यांची असताना विम्बल्डन टायटल जिंकले. हा एक विक्रम आहे. तेव्हापासून कारकीर्दीत अनेक चढउतार आले. वर्षभरात २० ते २२ स्पर्धा खेळते. मी आनंदी असून कामगिरीवर अभिमान आहे.’महिला एकेरीत पुनरागमन करण्याचा विचार आहे काय, असे विचारताच हिंगीस म्हणाली,‘ ३५ वर्षे वयात एकेरी सामने खेळण्याचा मी विचार करू शकत नाही. मी महिला दुहेरी आणि मिश्र प्रकारात समाधानी आहे. हिंगीस काही वेळ महेश भूपतीसोबतही खेळली आहे. यावर ती म्हणते, महेश आणि लियांडर हे दोघेही वेगवान तसेच तरबेज टेनिस खेळतात. खेळात कधी काय करावे हे त्यांना ठाऊक असल्याने दोघेही मौल्यवान खेळाडू ठरतात. सध्या चॅम्पियन्स टेनिस लीगसारख्या स्पर्धा लोकप्रिय ठरत आहेत. याविषयी विचारताच हैदराबाद अ‍ॅसेस संघाचे प्रतिनिधित्व करणारी हिंगिस म्हणाली,मी ‘सीटीएल लीगमध्ये खेळण्याचा आनंद लुटते आहे. विजय अमृतराज यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या स्पर्धेमुळे संघ भावना वाढीस लागत आहे. या लीगचा लाभ भारतीय ज्युनियर टेनिसपटूंना होईल. त्यासाठी चांगले कोचिंग हवे. कोचेसनी या ज्युनियर खेळाडूंवर मेहनत घ्यायला हवी.’ (क्रीडा प्रतिनिधी)लिएंडर अतुलनीय खेळाडूहिंगीसने भारतीय सहकारी सानिया आणि लिएंडरची स्तुती केली. सानिया ही सध्या कारकीर्दीत सर्वोच्च शिखरावर असून महिला टेनिसमध्ये फोरहॅन्डच्या तिच्या फटक्यांना तोड नाही. ग्रासकोर्टवर ती कुणाचाही मुकाबला करू शकते. लियांडर तर अतुलनीय खेळाडू आहे. त्याच्यासोबत सहजपणे खेळते. दोन्ही भारतीय आगळेवेगळे असल्यामुळेच दुहेरीत आमची जोडी भक्कम ठरली आहे.’