मेरिकोमसाठी वाईल्ड कार्डची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 18:07 IST2016-06-22T18:07:49+5:302016-06-22T18:07:49+5:30

देशातील बॉक्सर्सचे संचालन करणाऱ्या अस्थायी समितीने वाईल्ड कार्डची मागणी केली आहे.

Wild card demand for Merikom | मेरिकोमसाठी वाईल्ड कार्डची मागणी

मेरिकोमसाठी वाईल्ड कार्डची मागणी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 22 - पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरिकोम हिला रिओ आॅलिम्पिकला पाठविण्याच्या अखेरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय आॅलिम्पिक संघटना तसेच देशातील बॉक्सर्सचे संचालन करणाऱ्या अस्थायी समितीने वाईल्ड कार्डची मागणी केली आहे. मेरिकोम पात्रता स्पर्धेद्वारे रिओ आॅलिम्पिकला जाण्यास अपयशी ठरली. मेरिकोमने नंतर आयओएकडे आग्रह धरला. तिच्या विनंतीनुसार आयओएने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडे मेरीसाठी वाईल्ड कार्डची विनंती केली. यासंदर्भात बोलताना आयओए अध्यक्ष एन. रामचंद्रन म्हणाले, मेरिकोमची विनंती मान्य करीत आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनेकडे वाईल्ट कार्डचा आग्रह धरला आहे.
किशन नरसी यांच्या नेतृत्वाखालील अस्थायी समितीने देखील एआयबीएला पत्र लिहून मेरिकोमला वाईल्ड कार्डद्वारे आॅलिम्पिकमध्ये खेळू देण्याची विनंती केली आहे. मेरिकोम ५१ किलो वजन गटात खेळते. या गटात केवळ एकाच बॉक्सरला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळू शकतो. मागच्या महिन्यात झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत मेरिकोमला पराभवाचा धक्का बसल्याने तिचा आॅलिम्पिक प्रवेश हुकला होता.

Web Title: Wild card demand for Merikom