शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कोण होईल चौसष्ट घरांचा ‘प्रिन्स’?

By admin | Updated: October 6, 2014 12:08 IST

ज्युनिअर गटामधील चौसष्ट घरांचा राजा कोण, याचे उत्तर पुण्यात रंगणाऱ्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेतून (डब्ल्यूजेसीसी) मिळणार आहे

पुणे : ज्युनिअर गटामधील चौसष्ट घरांचा राजा कोण, याचे उत्तर पुण्यात रंगणाऱ्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेतून (डब्ल्यूजेसीसी) मिळणार आहे. अहमदनगर रोडवरील हॉटेल हयातमध्ये होत असलेल्या स्पर्धेचे आज उद्घाटन झाले. उद्या (रविवार) पासून प्रत्यक्ष लढतींना प्रारंभ होईल.व्लादिमीर फेडोसीव (रशिया, २६६१ रेटिंग गुण) आणि मुलींमध्ये अलेक्झांड्रा गोर्याचकिना (रशिया, २४३०) यांना अनुक्रमे खुल्या आणि मुलींच्या गटात अव्वल मानांकन असून, त्यांना विजेतेपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे. खुल्या गटात १३५ खेळाडू आहेत, तर ४५ देशांतून आलेल्या ७५ मुलींमध्ये वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पियन आणि वर्ल्ड ज्युनिअर गर्ल्स चॅम्पियन स्पर्धांसाठी सामने होतील. खुल्या आणि महिला गटात विजेतेपद मिळविणाऱ्या बुद्धिबळपटूंना ग्रँडमास्टर आणि वूमन ग्रँडमास्टर किताब दिले जातील. हे विजेते आगामी वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील. याशिवाय विजेत्यांना ६ लाख रुपयांचे रोख पारितोषिकही मिळणार आहे. दोन्ही गटांतील सर्वाेत्तम भारतीय बुद्धिबळपटूंना विशेष पारितोषिक म्हणून पुणे महापौर चषक देण्यात येईल. या पारितोषिकांबरोबरच खेळाडूंसाठी जीएम, आयएम, डब्ल्यूजीएम व डब्ल्यूआयएमसाठीचे नॉर्म्सही पणाला लागणार आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा विचार करता मुलांमधून महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर विदित गुजराथी आणि मुलींमधून ओडिशाची महिला ग्रॅण्डमास्टर पद्मिनी राऊत यांच्यावर मुख्य मदार असेल. नाशिकच्या विदितला या स्पर्धेत खुल्या गटातून चौथे, तर मुलींमधून पद्मिनीला सहावे मानांकन आहे. दिल्लीचा ग्रॅण्डमास्टर सहज ग्रोवर, इंटरनॅशनल मास्टर दिप्तायन घोष, ग्रॅण्डमास्टर अंकित राजपाडा, इंटरनॅशनल मास्टर मुरली कार्तिकेयन, पुण्याची ऋचा पुजारी, पी. व्ही. नंदिता, इवाना मारिया फुर्ताडो, आर. वैशाली या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीबाबतही उत्सुकता आहे. स्पर्धेचे उद्घाटन लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाचे (एलआयसी) अध्यक्ष एस. के. रॉय यांच्या हस्ते झाले. यावेळी फिडेचे प्रतिनिधी रॉबर्ट झिफ्कोव्हिस्स, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि डब्ल्यूजेसीसीच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयराज पाठक, आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा ६ ते १९ तारखेदरम्यान स्विस लीग पद्धतीने खेळली जाणार असून, त्यात दररोज एक फेरी याप्रमाणे १३ फेऱ्या असतील. (क्रीडा प्रतिनिधी)