शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार कोपा किंंग?

By admin | Updated: June 26, 2016 02:00 IST

अमेरिका खंडाचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना विद्यमान चॅम्पियन चिली आणि अर्जेटिना यांच्यात होत असून स्टार फुटबॉलर

आज फायनल : मेस्सीवर अर्जेंटिनाचा भरवसा न्यूयॉर्क : अमेरिका खंडाचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना विद्यमान चॅम्पियन चिली आणि अर्जेटिना यांच्यात होत असून स्टार फुटबॉलर लियोनल मेस्सीच्या जोरावर चिलीकडून विजेतेपदाचा मुकुट हिसकावून घेण्यास अर्जेंटिना सज्ज झाला आहे.पाच वेळेचा वर्ल्ड फुटबॉलर आॅफ द इयर मेस्सीने आपल्या कारकिर्दीत पेले आणि माराडोना यांच्या तुलनेत सर्व काही मिळवले असले तरी तो आपल्या मायदेशाला कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही. ईस्ट रुदरफोर्डच्या मेटलाईफ स्टेडीयममध्ये ८१ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत अर्जेटिनाचा संघ चिलीला हरवून २३ वर्षांचा आपला विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्न करेल. मेस्सी सेनेची गेल्या तीन वर्षातील मोठ्या स्पर्धेची ही तिसरी फायनल आहे. मेस्सी या स्पर्धेत शानदार फॉर्ममध्ये असून त्याने पाच गोल केले आहेत. यात पॅराग्वेविरुध्दच्या त्याच्या शानदार हॅटट्रीकचा समावेश आहे. याच स्पर्धेत त्याने ५५ व्या गोलची नोंद करुन अर्जेटिनाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. अंतिम सामन्यातही मेस्सीकडून देशवासियांना अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. अर्जेंटीनाला २0१४ मध्ये विश्वचषकात जर्मनीकडून 0-१ गोलने पराभूत व्हावे लागले होते. गेतवर्षी कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीकडून पेनाल्टी शूटआऊटमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था) आमच्या संघाने रविवारी कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवला पाहिजे अन्यथा त्यांनी परत येवू नये. - दिएगो माराडोना, माजी कर्णधार अर्जेटिनाजे कोणताही विचार न करता टीका करतात त्यांची मला कीव येते. आम्ही दोनदा उपविजेतेपद मिळवले आहे, हेही कमी नाही. - लियोनल मेस्सी, स्टार फुटबॉलर अर्जेटिना