शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बीसीसीआयचा नवीन कर्णधार कोण?

By admin | Updated: September 21, 2015 23:59 IST

बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आमसभेची विशेष बैठक बोलविणे आवश्यक आहे

कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आमसभेची विशेष बैठक बोलविणे आवश्यक आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बीसीसीआयच्या घटनेतील कलम ‘१६ ड’नुसार अध्यक्षाचे निधन झाल्यानंतर बोर्डाच्या सचिवांना आमसभेची विशेष बैठक बोलविण्याचा नोटीस जाहीर करण्याचा अधिकार आहे. २१ दिवसांच्या आत या बैठकीचे आयोजन होणे आवश्यक आहे. त्यात अंतरिम अध्यक्षाची निवड होईल.’बीसीसीआयची सध्याची स्थिती बघता अध्यक्षाची निवडणूक किंवा निवड करणे सोपे नाही. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे. शुक्ला यूपीसीएचे अध्यक्ष आहेत. त्यासाठी त्यांना पूर्व विभागातील संलग्न राज्य संघटनांचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे. पूर्व विभागाचे उपाध्यक्ष गौतम राय दावेदार ठरू शकतात. पाच उपाध्यक्षांमध्ये ते सर्वांत सीनिअर आहेत. १९९२ मध्ये ग्वाल्हेरमध्ये झालेल्या आमसभेमध्ये त्यांची निवड झाली होती. रॉय यांना बीसीसीआयकडून अधिक पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. दिल्लीच्या के. सी. खन्ना यांचीही स्थिती अशीच आहे. ते मध्य विभागाचे उपाध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार ठाकूर यांना नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी आमसभेची विशेष बैठक बोलवावी लागेल; पण त्यांना या बैठकीचे आयोजन करता येईल किंवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच कार्यसमितीच्या बैठकीची पुढील तारीख निश्चित होईल. (वृत्तसंस्था)