शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीच वन डे धोक्यात, वेस्ट इंडीज संघ संपावर जाणार ?

By admin | Updated: October 8, 2014 11:13 IST

कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

कोची, दि. ८ - कोची येथील एकदिवसीय सामना सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने करारात मानधनामध्ये कपात केल्याच्या निषेधार्थ वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी संपाचे अस्त्र उगारले आहे. वेस्ट इंडीज क्रिकेटपटू संपावर गेल्यास या मालिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 

वेस्ट इंडीज संघ पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वचषकाच्या संघ निवडीसाठी ही मालिका भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. मात्र या मालिकेच्या सुरुवातीलाच वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड व खेळाडूंमध्ये करारावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. क्रिकेट बोर्डाने केलेल्या नवीन करारात वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये भरभक्कम कपात करण्यात आली आहे.  बोर्डाच्या या करारामुळे संघाचे मनोबल घटले असून परिस्थितीवर तोडगा निघाला नाही तर खेळाडू स्वतःच्या हातात सूत्र घेतील असे वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्होने एका पत्रात म्हटले आहे. वेस्ट इंडीज संघाने मंगळवारी सरावही केला नव्हता तसेच त्यांनी पत्रकार परिषदेला येणे टाळले होते. वेस्ट इंडीज क्रिकेटपटूंनी संपाचा इशारा दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डानेही बीसीसीआयला पत्र पाठवून माफी मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आमचे खेळाडू पहिल्या सामन्यात सहभागी होणार नसून यामुळे होणा-या नुकसानासाठी चाहते व बीसीसीआयची आम्ही माफी मागतो असा स्पष्ट उल्लेख केल्याचे समजते.