शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव

By admin | Updated: February 27, 2015 16:05 IST

दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव करीत आफ्रिकेने विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.

ऑनलाइन लोकमतसिडनी, दि. २७ - दक्षिण आफ्रिकेविरुध्द वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या आजच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव करीत आफ्रिकेने विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.

ए.बी.डिव्हिलियर्सने अवघ्या ६६ चेंडूत केलेल्या १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकेने विश्वचषकातील आत्तापर्यंतची दुस-या क्रमांकाची सर्वौच्च धावसंख्या उभारली. सिडनी क्रिकेट मैदानावर आफ्रिकन फलंदाजांनी अफलातून फलंदाजी करीत ४००चा टप्पा ओलांडला.आफ्रिकन संघाने ५ गडी गमावून वेस्ट इंडिज संघासमोर विजयासाठी भल्यामोठया ४०९ धावसंख्येचे आव्हान ठेवले. आफ्रिकन संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. सलामीला आलेला कॉक्‍ १२ धावावर बाद झाला परंतू त्यानंतर आलेल्या आमलाने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर हमला चढवला. हाशिम आमलाने ६५, ड्यू प्लेसिस ६२, रोस्सो ६१, मिल्लर २०, आणि ए.बी.डिव्हिलियर्सने केलेल्या नाबाद १६२ धावांच्या जोरावर आफ्रिकन संघाने ५० षटकात ५ गडी गमावून ४०८ धावा केल्या. विश्वचषकाच्या साखळी फेरीतच वेस्ट इंडिजला तब्बल ४०९ धावांचे आव्हान समोर आल्यानंतर विंडिजची सुरूवात आक्रमक होईल हा समज चुकीचा ठरला. सलामीला आलेल्या ख्रिस गेलला अवघ्या ३ धावांत बाद करीत आफ्रिकन गोलंदाजांनी विंडिजला पहिला धक्का दिला. वेस्ट इंडिजकडून जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सिमन्स ००, सॅमी ०५, रसेल ००, बेन ०१, जे टेलरच्या नाबाद १५ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ १५१ धावाच करता आल्या. विंडिजच्या फलंदाजांना सूर न गवसल्याने त्यांना विश्वचषकातील २५७ धावांनी अशा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आफ्रिकेकडून सर्वाधिक इमरान ताहिरने सर्वाधिक ५ गडी बाद केले तर एबोट, मार्कोलने प्रत्येकी २-२ गडी बाद करण्यात यश मिळवले तर स्टेनला १ गडी बाद करता आला.