वेस्ट इंडिजचा द. आफ्रिकेवर तीन गडी राखून विजय

By Admin | Updated: March 25, 2016 23:13 IST2016-03-25T23:05:26+5:302016-03-25T23:13:07+5:30

टी-२० वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन गडी राखून विजय मिऴविला. त्यामुळे आता वेस्ट इंडिजचे टी-२० वर्ल्डकपमधील

West Indies D Victory by three wickets on Africa | वेस्ट इंडिजचा द. आफ्रिकेवर तीन गडी राखून विजय

वेस्ट इंडिजचा द. आफ्रिकेवर तीन गडी राखून विजय

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २५ - टी-२० वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन गडी राखून विजय मिऴविला. त्यामुळे आता वेस्ट इंडिजचे टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्यफेरीतील स्थान पक्के झाले आहे. 
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २० षटकात आठ बाद १२२ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १९.४ षटकात सात बाद  १२३ धावा केल्या.  या सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज मार्लोन साम्युल्सने ४४ चेंडूत सहा चौकार लगावत ४४ धावा केल्या. तर जॉन्सन चार्लेसने ३२ धावा आणि अंद्रे फ्लेंचरने ११ धावा केल्या. 
दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर डि कॉकच्या ४७ धावा आणि विसेच्या २८ धावा या दोघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. रसेल, गेल आणि ब्राव्होने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डि कॉक आणि विसेमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ५० धावांची भागीदारी दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक भागीदारी ठरली. 

Web Title: West Indies D Victory by three wickets on Africa