शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही अंतिम सामन्याच्या निर्धारानेच खेळू

By admin | Updated: October 19, 2016 04:29 IST

(जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल

बंगळुरु : मलेशियाच्या जोहोर दारुल ताजिम (जेडीटी) क्लबविरुद्ध बाजी मारून बंगळुरू फुटबॉल क्लब एएफसी कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या निर्धाराने खेळेल, असा विश्वास कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केला.विशेष म्हणजे, जर बंगळुरू एफसी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, तर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय संघ म्हणून बंगळुरू एफसी इतिहास निर्माण करेल. त्याचवेळी या दोन संघांदरम्यान जोहोर बाहरू येथे झालेल्या पहिल्या सत्रातील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता, तर या वेळी संघ नव्या विचाराने मैदानावर उतरणार असून कामगिरीत नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही छेत्रीने व्यक्त केला. छेत्री म्हणाला, ‘‘इतर सामन्यांप्रमाणेच या सामन्याकडे आम्ही पाहत आहोत. या सामन्यातून भारतीय फुटबॉलचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. काहीतरी नवीन करण्याच्या जवळ आम्ही आहोत. यासाठीच आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करण्याची गरज आहे. हा सामना केवळ बंगळुरूचा नसून पूर्ण देशाचा आहे.’’ छेत्री म्हणाला, ‘‘विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून आम्ही मैदानात उतरू. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. माझ्या मते सामन्याविषयी आपल्याला अतिउत्साही होता कामा नये आणि केवळ सामन्यावर लक्ष केंद्रित करावं.’’ बंगळुरू एफसीने जेडीटीविरुद्ध अद्याप एकही विजय मिळवलेला नसून याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर काहीही फरक पडणार नाही असे छेत्रीने सांगितले. (वृत्तसंस्था)>गेल्यावेळी जेडीटीविरुद्ध आमचा १-२ असा पराभव झाला होता. त्यांचा संघ खूप मजबूत आहे. मी सामन्यात सकारात्मक विचाराने उतरेल. इराण आणि ओमान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही आपण विजयी होऊ शकतो, या विचाराने मी खेळलो होतो.- सुनील छेत्री