वावरिंकाची जेतेपदाची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: January 11, 2016 03:20 IST2016-01-11T03:20:30+5:302016-01-11T03:20:30+5:30

गत दोन वेळेसचा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका याने ४,२५,५३५ डॉलरच्या चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम

Wavirinka's wrestling hat-trick | वावरिंकाची जेतेपदाची हॅट्ट्रिक

वावरिंकाची जेतेपदाची हॅट्ट्रिक

चेन्नई : गत दोन वेळेसचा चॅम्पियन आणि अव्वल मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंका याने ४,२५,५३५ डॉलरच्या चेन्नई ओपन एटीपी टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रविवारी क्रोएशियाच्या बोर्ना कोरीच याचा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
अव्वल मानांकित वावरिंकाने आठव्या मानांकित कोरीच याचा ६-३, ७-५ असा सलक सेटस्मध्ये पराभव करीत विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवली. वावरिंकाने फ्रान्सच्या बेनोएट पेयरे याला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली होती, तर कोरीचने ब्रिटनच्या एल्जाज बेदेने याला धूळ चारत फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. ३0 वर्षीय वावरिंकाने एक तास २६ मिनिटे चाललेल्या या लढतीत जबरदस्त कामगिरी केली. जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित
खेळाडू वावरिंकाने पहिल्या सेटमध्ये ६-३ असा सहज विजय मिळवला; परंतु दुसरा सेट चुरशीचा ठरला. स्वीस स्टारने दुसरा सेट ७-५ असा जिंकताना ही लढत आणि सामना आपल्या नावावर केली आणि सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा गौरव प्राप्त केला.(वृत्तसंस्था)

Web Title: Wavirinka's wrestling hat-trick