विंडीज विजयरथ रेटण्यास इच्छुक

By Admin | Updated: March 27, 2016 01:12 IST2016-03-27T01:12:07+5:302016-03-27T01:12:07+5:30

सलग तीन विजयांसह वेस्ट इंडीजने ग्रुप एक मधून टी-२० विश्वचषकाची उपांत्यफेरी आधीच सर केली. आज, रविवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर

Wanted to rate Windies Wiserath | विंडीज विजयरथ रेटण्यास इच्छुक

विंडीज विजयरथ रेटण्यास इच्छुक

नागपूर : सलग तीन विजयांसह वेस्ट इंडीजने ग्रुप एक मधून टी-२० विश्वचषकाची उपांत्यफेरी
आधीच सर केली. आज, रविवारी विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध अखेरचा साखळी सामना औपचारिकता असेल. हा सामना जिंकून पुढे जाण्याचा विंडीजचा निर्धार असला तरी किमान विजयासह निरोप घेण्यास अफगाण संघ इच्छुक आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या २१० धावांना उत्तर देत त्यांनी दोन बाद १०५ धावांपर्यंत मजल गाठली, पण नंतर डाव कोसळल्याने पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंडविरुद्धदेखील विजयाची संधी होती; पण मोईन अली मदतीला धावल्याने अफगाण संघ पराभूत झाला. या संघाने अद्याप मोठ्या संघाला नमविले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)

व्हीसीए स्टेडियम, जामठा

दुपारी ३.०० पासून

Web Title: Wanted to rate Windies Wiserath