शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
5
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
6
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
7
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
8
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
9
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
10
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
11
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
12
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
13
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
14
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
15
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
16
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
17
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
18
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
19
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
20
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज १६३ धावांत गारद

By admin | Updated: October 24, 2015 04:16 IST

पहिल्या दिवशी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्ध मजबूत पकड मिळवलेल्या वेस्ट इंडिजला फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा चांगलाच फटका बसला.

कोलोंबो : पहिल्या दिवशी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान श्रीलंकेविरुद्ध मजबूत पकड मिळवलेल्या वेस्ट इंडिजला फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा चांगलाच फटका बसला. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच लंकेला २०० धावांत गुंडाळल्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १६३ धावांत संपुष्टात आला. यानंतर लंकेने दुसऱ्या डावात २ बाद ७६ अशी मजल मारली असून दुसऱ्या दिवसअखेर त्यांच्याकडे ११३ धावांची आघाडी आहे.गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व राखण्याची नामी संधी घालवली. सोबर्स यांच्या उपस्थितीत विंडिजने शानदार खेळ करताना लंकेला झटपट गुंडाळले. मात्र फलंदाजांनी गोलंदाजांच्या कामगिरीवर पाणी फेरले. धम्मीका प्रसादने ४ तर दिलरुवान परेराने ३ बळी घेत विंडिजला हादरे दिले. विंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेट याने सर्वाधिक ४७ धावांची खेळी करुन एकाकी झुंज दिली. त्याच्यानंतर कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २१ धावा काढल्या. यावरुनच विंडिजची उडालेली दाणादाण लक्षात येते.विंडिजचा १६३ धावांत खुर्दा पाडल्यानंतर लंकेने ३७ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ७६ धावांची भर टाकून आतापर्यंत ११३ धावांची आघाडी घेतली आहे. दिमूथ करुणारत्ने शून्यावर बाद झाल्यानंतर कौशल सिल्वा आणि कुशल मेंडिस यांनी ५५ धावांची आघाडी करुन संघाला सावरले. मेंडिस ६६ चेंडूत ७ चौकारांसह ३९ धावा काढून परतला. दुसऱ्या दिवसअखेर सिल्वा (नाबाद ३१) आणि दिनेश चंडीमल (नाबाद ५) खेळपट्टीवर टिकून राहिले.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :श्रीलंका पहिला डाव : ६६ षटकांत सर्वबाद २००, दिमुथ करूणारत्ने पायचीत गो. होल्डर १३, कौशल सिल्वा झे. रामदिन गो. टेलर ०, दिनेश चंदीमल त्रि.गो. टेलर २५, मिलिंदा श्रीवर्र्धना झे. टेलर गो. वारिकन ६८, रंगना हेराथ नाबाद २६, जेरॉम टेलर २/५०, केमार रोश १/३०, जॅसन होल्डर २/२२, जोमेल वारिकन ४/६७, देवेंद्र बिशू १/१८,वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्वबाद १६३ धावा. क्रेग ब्रेथवेट ४७, जेसन होल्डर २१, केमार रोच नाबाद १७; धम्मीका प्रसाद ४/३४, दिलरुवान परेरा ३/२८, मिलिंदा सिरीवरदना २/२६.श्रीलंका (दुसरा डाव) : ३१ षटकांत २ बाद ७६ धावा. कौशल सिल्वा खेळत आहे ३१, दिनेश चंडिमल खेळत आहे ५; जेरोम टेलर १/१५, जोमेल वॉररिकन १/२१.