Vishwa: भारताच्या युवा टेबल टेनिसपटूचा भीषण अपघातात मृत्यू, कायदामंत्र्यांकडून शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:31 AM2022-04-18T08:31:21+5:302022-04-18T10:10:07+5:30

केंद्रीय कायदामंत्री किरन रिजीजू यांनी विश्वाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

Vishwa Deenadayalan India's young tennis player dies in horrific accident, mourning by law minister | Vishwa: भारताच्या युवा टेबल टेनिसपटूचा भीषण अपघातात मृत्यू, कायदामंत्र्यांकडून शोक

Vishwa: भारताच्या युवा टेबल टेनिसपटूचा भीषण अपघातात मृत्यू, कायदामंत्र्यांकडून शोक

googlenewsNext

तरुण टेबल टेनिस खेळाडू विश्वा दीनदयाल यांचे रविवारी अपघातात निधन झाले. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी तो गुवाहाटीवरुन शिलांगकडे जात असताना त्याच्या गाडीला भीषण अपघात झाला. 18 वर्षीय विश्वासह या टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या रमेश संतोष कुमार, अविनाश प्रसन्नाजी श्रीनिवासन आणि किशोर कुमार हेही गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. 

केंद्रीय कायदामंत्री किरन रिजीजू यांनी विश्वाच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. रिजीजू यांनी ट्विट करुन विश्वा यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, ''तामिळनाडूचे युवा टेनिस खेळाडू विश्वा दिनदयाल यांच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झालं. 83 व्या सिनियर नॅशनल आणि इंटर-स्टेट टेबल टेनिस चॅम्पियनशीपमध्ये भाग घेण्यासाठी ते जात असताना मेघालयच्या री भोई येथे ही दुर्घटना घडली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे,'' असे ट्विट रिजीजू यांनी केले आहे. 


टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. टीटीएफआयच्या जाहिरातीत सांगण्यात आले की, विरुद्ध दिशेने येत असलेल्या 12 चाकी ट्रेलर उमली चेकपोस्टजवळ रस्त्यावरील दुभाजकास धडकला. त्याचवेळी, समोरील टॅक्सीला धडक दरीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत टॅक्सीचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, विश्वा यास नॉर्थ ईस्टर्न इंदिरा गांधी रीजनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ अँड मेडिकल सायंसेसने मृत घोषित केले. 

दिनदयाल विश्वा हे प्रतिभासंपन्न खेळाडू होते, रँकींग स्तरावर त्याने अनेक पुरस्कार जिंकले होते. 27 एप्रिलपासून ते ऑस्ट्रेयाच्या लिंजमध्ये होणाऱ्या डब्लूटीटी युवा चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार होते.  
 

Web Title: Vishwa Deenadayalan India's young tennis player dies in horrific accident, mourning by law minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.