शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

विराटने नवाब पतौडी, गावसकर यांना गाठले

By admin | Updated: October 5, 2016 04:05 IST

सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहलीने नवाब पतौडी व सुनील गावसकर यांची बरोबरी केली

नवी दिल्ली : सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या बाबतीत कर्णधार म्हणून विराट कोहलीने नवाब पतौडी व सुनील गावसकर यांची बरोबरी केली. कोलकाता येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली.या शानदार विजयासह भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आला. शिवाय, घरच्या मैदानावर झालेल्या २५०व्या कसोटी सामन्यातही बाजी मारली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोहलीने कर्णधार म्हणून नऊ सामने जिंकण्याची पतौडी व गावसकर यांची बरोबरी केली. नवाब पतौडी यांनी आपल्या नेतृत्वाखाली ४० कसोटी खेळताना ९ सामने जिंकले, तर १९ पराभव व १२ सामने अनिर्णित राखले. तसेच, गावसकर यांनी ४७ कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ९ सामने जिंकले असून, ८ सामन्यांत पराभव व ३० सामने अनिर्णित राखले आहेत. त्याचवेळी कोहलीने आतापर्यंतच्या आपल्या लहानशा कारकिर्दीमध्ये १६ सामन्यांत नेतृत्व करताना नऊ विजय मिळवताना दोन पराभव व पाच अनिर्णित अशी कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे, सर्वाधिक सामने जिंकणारा यशस्वी भारतीय कर्णधार म्हणून कोहली संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. तसेच, इंदोर येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बाजी मारून पतौडी व गावसकर यांना पिछाडीवर टाकण्याची संधी कोहलीकडे आहे. (वृत्तसंस्था)दरम्यान, कोहलीच्यापुढे मोहम्मद अझरुद्दिन (४७ पैकी १४ विजय), सौरभ गांगुली (४९ पैकी २१) आणि महेंद्रसिंह धोनी (६० पैकी २७) आहेत.