दबावाखाली विराटची खेळी सचिनहून सरस - इम्रान खान

By Admin | Updated: June 15, 2016 11:12 IST2016-06-15T11:10:30+5:302016-06-15T11:12:08+5:30

बावाखाली व कठीण परिस्थितीत विराट कोहली हा सचिनपेक्षा सरस फलंदाज आहे' असा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने केल्याने पुन्हा एकदा सचिन व विराटची तुलना सुरू झाली आहे

Virat Kohli under the pressure of Sachin - Saras - Imran Khan | दबावाखाली विराटची खेळी सचिनहून सरस - इम्रान खान

दबावाखाली विराटची खेळी सचिनहून सरस - इम्रान खान

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १५ - 'दबावाखाली व कठीण परिस्थितीत विराट कोहली हा सचिनपेक्षा सरस फलंदाज आहे' असा दावा पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानने केल्याने पुन्हा एकदा सचिन व विराटची तुलना सुरू झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. 
' मी आत्तापर्यंत पाहिलेल्या खेळाडूंमध्ये विराट हा एक परिपूर्ण खेळाडू आहे. तो अष्टपैलू खेळाडू असून मैदानात चौफेर फटकेबाजी करू शकतो' असं खान यांनी सांगितलं. ' विराटकडे प्रतिभा आणि (खेळाचे) तंत्र तर आहे पण तो एक संतुलित खेळाडू आहे. सचिनपेक्षाही त्यांचे संतुलन अधिक आहे. “कठीण परिस्थितीत विराटची कामगिरी उंचावते, मात्र अशा काही स्थितीत सचिन सपशेल अपयशी ठरायचा,' असेही खान म्हणाले. क्रिककेटचा स्वत:चा एक काळ असतो. 1980 च्या काळात व्हिव्हियन रिचर्ड्स, त्यानंतर ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकरचा काळ आला. पण विराट सर्वात परिपूर्ण फलंदाज आहे असा पुनरुच्चार त्यांनी केला. 

Web Title: Virat Kohli under the pressure of Sachin - Saras - Imran Khan